टी-20 विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल शुभमन गिलनं सोडलं मौन; कीवींविरुद्धच्या मालिकेपूर्वी म्हणाला...
खराब फॉर्ममुळं शुभमन गिलला भारताच्या टी-20 संघातून वगळण्यात आलं. दरम्यान, टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आल्यानंतर त्यानं आपलं मौन सोडलं आहे.

Published : January 10, 2026 at 5:01 PM IST
वडोदरा Shubman Gill : 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषक सुरु होणार आहे. बीसीसीआयनं या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. अलिकडेपर्यंत शुभमन टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता, परंतु खराब फॉर्ममुळं त्याला भारताच्या टी-20 संघातून वगळण्यात आलं. दरम्यान, टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आल्यानंतर शुभमन गिलनं आपलं मौन सोडलं आहे.
I am where I have to be and whatever is written in my destiny no one can take that from me. A player always believes he will try his best for the country and the selectors have taken their decision: India's ODI and Test captain Shubman Gill on exclusion from T20 World Cup. pic.twitter.com/0kK6WN7v3H
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2026
शुबमन गिल संघातून वगळल्याबद्दल काय म्हणाला : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या सुरुवातीपूर्वी शुभमन गिल पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्याला टी-20 विश्वचषकातून वगळल्याबद्दल विचारण्यात आलं. उत्तर देताना तो म्हणाला, "मी जिथं असायला हवं तिथंच आहे आणि माझ्या नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खेळाडू नेहमीच असा विश्वास ठेवतो की तो देशासाठी त्याचे सर्वोत्तम देईल आणि निवडकर्त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि संघाला टी-20 विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो."
शुभमनची टी-20 मधील कामगिरी निराशाजनक : शुभमननं 2025 मध्ये भारतासाठी एकूण 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 24.25 च्या सरासरीनं आणि 137.26 च्या स्ट्राईक रेटनं फक्त 219 धावा केल्या. या काळात तो एकही अर्धशतक करु शकला नाही. त्याला सलामीवीर म्हणून सातत्यानं संधी मिळाल्या, परंतु त्या संधींचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला, ज्यामुळं शेवटी त्याला संघातून बाहेर जावं लागलं. गिलनं आतापर्यंत भारतासाठी 36 टी-20 सामन्यांमध्ये 28.03 च्या सरासरीनं 869 धावा केल्या आहेत. सध्या त्याचं लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेवर आहे.
STORY | Whatever is written in my destiny no one can take that from me: Gill on T20 exclusion
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2026
Left out of the T20 World Cup squad, India's ODI and Test captain Shubman Gill on Saturday said he respects the selectors' decision and remains focused on giving his best whenever the… pic.twitter.com/TY3ePKU2ql
अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार : गिलला टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर, अक्षर पटेलला टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. भारत घरच्या मैदानावर त्यांचं टी-20 विश्वचषक विजेतेपद राखण्याचं ध्येय ठेवेल. 2024 च्या विश्वचषकात, टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला हरवून 2007 नंतरचा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघाचा भाग होते.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक)
हेही वाचा :

