दोन सिक्सर अन् षटकारांचा बादशाह बनला रोहित शर्मा बनला; केला अजरामर रेकॉर्ड!
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.

Published : January 11, 2026 at 7:15 PM IST
वडोदरा Sixer King in ODI : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. रविवारी (11 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात हिटमॅननं दोन षटकार मारुन इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्यानं 553 षटकार मारले आहेत. म्हणजे हिटमॅन आणि युनिव्हर्स बॉसमधील अंतर 95 षटकारांचं आहे.
🚨 HISTORY BY ROHIT SHARMA 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) January 11, 2026
- Rohit Sharma becomes the first Batter to complete 650 sixes in International cricket 🤯🔥 pic.twitter.com/6lDxL4x0o2
रोहित शर्मानं केला विश्वविक्रम : भारतीय संघासाठी रोहित शर्मानं पहिल्या वनडे सामन्यात 26 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्यानं दोन षटकार आणि तीन चौकार मारले. काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करताना तो कीवी कर्णधार मायकेल ब्रेसवेलकडे झेल देत बाद झाला. मात्र सामन्यात दोन षटकार मारुन रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारले आणि हा विक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज बनला. त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम कोणीही केला नव्हता.
🚨🚀 ROHIT SHARMA – REWRITING HISTORY! 🏏🔥🚨
— Sonu Yadav (@sonuabhishek5) January 11, 2026
650 SIXES in international cricket! 🤯
The first and only batter to ever reach this insane milestone.
There’s power…
There’s timing…
And then there’s Rohit Sharma – The Hitman 💥
From effortless pulls to rooftop launches,
he’s… pic.twitter.com/kQ0VlgmnD8
रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर : याव्यतिरिक्त, रोहित शर्मा वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर बनला आहे, त्यानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहितनं आता वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 329 षटकार मारले आहेत, तर गेलनं सलामीवीर म्हणून 328 षटकार मारले आहेत.
𝙒𝙤𝙝 𝙤𝙥𝙚𝙣𝙞𝙣𝙜 𝙠𝙖𝙧𝙩𝙖 𝙝𝙖𝙞, 𝙖𝙪𝙧 𝙧𝙚𝙘𝙤𝙧𝙙 𝙩𝙤𝙙 𝙙𝙚𝙩𝙖 𝙝𝙖𝙞 🫡@ImRo45 becomes the opener with the most ODI sixes 🙌#INDvNZ, 1st ODI LIVE NOW 👉 https://t.co/WbMZTXL0By pic.twitter.com/5X93Mq4Z9H
— Star Sports (@StarSportsIndia) January 11, 2026
रोहितनं कोणत्या स्वरुपात किती षटकार : रोहित शर्मानं वनडे सामन्यात 357 षटकार मारले आहेत. 2025 मध्ये, त्यानं या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला, जो बराच काळ नंबर वन स्थानावर होता. रोहित शर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील आहे. त्यानं 205 षटकारांसह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. रोहितनं कसोटी क्रिकेटमध्येही 88 षटकार मारले आहेत. रोहित शर्मानं 2007 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सुरुवातीला तो चांगला खेळला नाही. मात्र, महेंद्रसिंग धोनीनं त्याला डावाची सुरुवात करण्यासाठी बढती दिली आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. त्यानं 280 वनडे सामन्यांमध्ये एकूण 11,542 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 33 शतकं आणि 61 अर्धशतकं आहेत.
हेही वाचा :

