क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडीलांचं निधन; टी-20 विश्वचषकादरम्यान कोसळला दुःखाचा डोंगर
टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडीलांचं निधन झालं आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.

Published : February 27, 2026 at 8:42 AM IST
नवी दिल्ली Rinku Singh Father Died : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडीलांचं निधन झालं आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिंकू सिंहचे वडील खाचंद्र सिंह हे स्टेज-4 लिव्हर कॅन्सरशी झुंजत होते. अलीकडेच त्यांची प्रकृती खालावली, ज्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. वडिलांच्या बिघडत्या प्रकृतीची माहिती मिळताच रिंकू सिंह देखील अचानक टीम इंडिया सोडून घरी परतला होता.
After battling fourth-stage cancer, Cricketer Rinku Singh’s father breathed his last at Yatharth Hospital-Omega -1, Greater Noida (Uttar Pradesh) today at 5 am: Yatharth Hospital PRO
— ANI (@ANI) February 27, 2026
(File photo) pic.twitter.com/bqjSaz24wq
रिंकू सिंहचे वडील व्हेंटिलेटर सपोर्टवर : रिंकू सिंहचे वडील खाचंद्र सिंह गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी मिळत होती. खाचंद्र सिंह यांना स्टेज-4 लिव्हर कॅन्सरनं ग्रस्त होते. त्यांच्या गंभीर प्रकृतीवर त्वरित उपचारांची आवश्यकता होती. नोएडा हॉस्पिटलमधील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. रिंकू सिंह अलीकडेच त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी नोएडा इथं गेला होता.
#WATCH | Uttar Pradesh: After battling fourth-stage cancer, Cricketer Rinku Singh’s father, Khanchand Singh passed away at Yatharth Hospital in Greater Noida earlier this morning.
— ANI (@ANI) February 27, 2026
Visuals from outside the hospital. pic.twitter.com/NvfT1xyhnX
सराव सत्रात नव्हता रिंकू सिंह : मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी टीम इंडियानं चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव सत्र आयोजित केले होते. मात्र, रिंकू सिंह सत्र सोडून नोएडाला त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी गेला. इतर खेळाडू सराव करताना दिसले. त्यानंतरच त्याचे वडील गंभीर आजारी असल्याची आणि आयुष्याशी झुंज देत असल्याची बातमी आली. 28 वर्षीय रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी आहे.
Pained to learn about the demise of Shri Khanchand Singh Ji, father of Rinku Singh. This must be an especially difficult time for Rinku and his family, even as he remains committed to his responsibilities during the T20 World Cup.
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 27, 2026
My heartfelt thoughts and prayers are with him…
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता : रिंकू सिंह 2026 च्या टी-20 विश्वचषकातील सर्व गट टप्प्यातील सामन्यांमध्ये खेळला होता. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 टप्प्यातील सामन्यातही खेळला होता. मात्र, या विश्वचषकात त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. तो खराब फॉर्ममध्ये होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो टीम इंडियामध्ये सामील झाला होता, परंतु त्याला त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
हेही वाचा :

