रक्षाबंधन 2026: बहिण-भावांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; वाढवली देशाची शान...!
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण. यामध्ये बहीण भावाला राखी बांधते. आज आम्ही तुम्हाला अशा भावा-बहिणीच्या जोडीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या देशासाठी क्रिकेट खेळलं आहे.

Published : August 28, 2026 at 2:40 PM IST
मुंबई Raksha Bandhan 2026 Special : आज सर्व भारतात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातोय. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. यात बहीण भावाला राखी बांधते. यासोबतच ती भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छाही देते. तर दुसरीकडे, भाऊ आयुष्यभर बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. राखी बांधल्यानंतर तो बहिणीला भेटवस्तूही देतो. क्रिकेटमध्ये अशा अनेक भावा-बहिणीच्या जोड्या आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे.
पीटर मॅकग्लॅशन आणि सारा मॅक्ग्लॅशन (न्यूझीलंड) :
सारा मॅक्ग्लॅशननं 2002 ते 2016 दरम्यान न्यूझीलंडसाठी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 2 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 134 वनडे आणि 76 टी-20 सामने सामील आहेत. तिच्या नावावर जवळपास 3500 धावा आहेत. तर तिचा भाऊ पीटर मॅकग्लॅशननं चार वनडे आणि 11 टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

विल सदरलँड आणि ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) :
ॲनाबेल सदरलँड ही ऑस्ट्रेलिया महिला संघाची आघाडीची अष्टपैलू खेळाडू आहे. तिनं 2024 मध्ये एका कसोटीत द्विशतक झळकावलं होतं. गोलंदाजीतही सरदलँडच्या कसोटीत 19, वनडेत 63 आणि टी-20 सामन्यांत नावावर 50 विकेट आहेत. ती डब्ल्यूपीएलमध्येही खेळते. ॲनाबेलचा भाऊ विल सदरलँड याला मागील वर्षी ऑस्ट्रेलियाकडून दोन वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या नावावर 18 धावा आणि 2 विकेट आहेत.

नॅथन ॲस्टल आणि लिसा ॲस्टल (न्यूझीलंड) :
कोणत्या क्रिकेट चाहत्यांना नॅथन ॲस्टलचं नाव माहीत नसेल? असं शक्य नाही. तो न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ॲस्टलच्या नावावर आहे. तर नॅथनची बहीण लिसा ॲस्टल हिनंही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
हॅरी टेक्टर आणि ॲलिस टेक्टर (आयर्लंड) :
हॅरी टेक्टर हा आयर्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं आयर्लंडकडून 10 कसोटी, 58 वनडे आणि 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं अनुक्रमे 492, 2098 आणि 1898 धावा केल्या आहेत. तर त्याची बहीण ॲलिस टेक्टरनं श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

एड जॉयस, डोम जॉयस आणि इसोबेल जॉइस, सेसेलिया जॉइस (आयर्लंड) :
आयर्लंडच्या जॉयस कुटुंबात चार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. एड जॉयस तर इंग्लंडकडूनही क्रिकेट खेळला आहे. तर डोमला आयर्लंडकडून तीन वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या दोन्ही बहिणी इसोबेल आणि सेसेलिया यांनी बरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. एका कसोटीशिवाय इसोबेलनं 79 वनडे आणि 55 टी-20 सामने खेळले आहेत. तर सेसेलियाला 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.
हेही वाचा :

