ETV Bharat / sports

पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये टी-20 विश्वचषकाचा उल्लेख; भारतीय खेळाडूंना उद्देशून केलं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 फेब्रुवारी) त्यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 131व्या भागात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 22, 2026 at 3:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 फेब्रुवारी) त्यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 131व्या भागात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी सध्या भारत आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाला अनुसरुन मोठ भाष्य केलं. याशिवाय त्यांनी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात भारताची वाढती भूमिका आणि अलिकडच्या एआय शिखर परिषदेवरही चर्चा केली.

भारतीय खेळाडू आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय योगदान : 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं की भारतीय खेळाडू जगभरातील अनेक संघांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी काही उदाहरणंही दिली, अमेरिकन संघातील अनेक खेळाडूंचे भारतीय देशांतर्गत क्रिकेटशी संबंध आहेत, जसे की मोनंक पटेल (जो गुजरातच्या अंडर-16 आणि अंडर-18 संघांचा सदस्य आहे), सौरभ, हरमीत सिंग आणि मिलिंद कुमार, यांचाही त्यांनी उल्लेख केला. ओमान संघात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत, जसं की जतिंदर सिंग, विनायक शुक्ला, करण, जय आणि आशिष, जे ओमान क्रिकेटचे मजबूत सदस्य आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय वंशाचे खेळाडू न्यूझीलंड, यूएई आणि इटलीच्या संघांमध्ये देखील आपला ठसा उमटवत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की हे खेळाडू त्यांच्या देशाला गौरव देत आहेत आणि परदेशी संघांसाठी प्रेरणा बनत आहेत.

खेळांचं सांस्कृतिक महत्त्व : पंतप्रधान मोदी यांनी असंही सांगितलं की, खेळ हा केवळ जिंकणे आणि हरण्यापुरता मर्यादित नाही, तर तो संस्कृती आणि देशांना जोडण्याचं माध्यम म्हणून काम करतो. त्यांनी भारतीय वंशाच्या खेळाडूंचा उल्लेख केला जे परदेशी संघांसाठी खेळत असतानाही भारतीय संस्कृती आणि मूल्यांपासून प्रेरणा घेतात. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंच्या वाढत्या प्रभावाची आणि योगदानाची प्रशंसा केली आणि खेळामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अभिमान निर्माण होत आहे यावरही भर दिला.

हेही वाचा :

  1. श्रीलंकेतील सुपर-8 चे सर्व सामने रद्द झाले तर सेमीफायनलमध्ये कोणते संघ जातील?
  2. Super-8 मधील भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळं रद्द होणार? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट
  3. ENG vs SL सामनाही संकटात! सामना रद्द झाल्यास काय होणार? वाचा समीकरण