ETV Bharat / sports

'जो खेलेगा वो खिलेगा' पंतप्रधान मोदींचा तरुण खेळाडूंशी संवाद; ऑलिम्पिकमधील सहभाग वाढवण्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'खेलो इंडिया डायलॉग - स्पोर्ट्स टॉक, विथ प्राइम मिनिस्टर मोदी' या कार्यक्रमाचा भाग म्हणून युवा खेळाडूंना संबोधित केलं.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 27, 2026 at 12:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'खेलो इंडिया डायलॉग - स्पोर्ट्स टॉक, विथ प्राइम मिनिस्टर मोदी' या कार्यक्रमाचा भाग म्हणून युवा खेळाडूंना संबोधित केलं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे खेळतात त्यांचीच भरभराट होते. खेळाडूंची नावं त्यांच्या राज्यांची आणि शहरांची ओळख निर्माण करतात. तसंच पंतप्रधानांनी सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

चार प्रमुख क्षेत्रांवर उपक्रमाचं लक्ष : राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 निमित्त 1500 हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला. यात आयआयटी, आयआयएम, एम्स, नामांकित वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठे सहभागी संस्था आहेत. हा उपक्रम चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो, तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करणं, प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक संधी, 2036 च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीनं प्रतिभा ओळखणं आणि विकसित करणं, प्रशासन आणि नेतृत्वात युवकांचा सहभाग वाढवणं, आणि युवकांना भविष्यासाठी तयार कौशल्यं, स्वयंसेवेच्या संधी आणि राष्ट्र उभारणीचे मार्ग उपलब्ध करुन देणं.

ऑलिम्पिकमधील सहभाग वाढवण्यावर भर : तरुण खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, "आपल्याला 2036 च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करायचे आहेत. खेळाडू ओळखण्यासाठी आपल्याला 'टॅलेंट हब' कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. प्रत्येक खेळात पदकं जिंकण्यासाठी भारतानं क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे. पदकतालिकेत वाढ करण्यासाठी प्रत्येक खेळात प्रगती करणं आवश्यक आहे. पाच ते पंधरा वयोगटातील खेळाडू ओळखले पाहिजेत. सरकार खेळांसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पुरवेल. ऑलिम्पिकमधील सहभाग वाढवण्यावर भर दिला पाहिजे. सरकार खेळाडूंना सर्वतोपरी मदत करेल."

सरकारकडून दिलं जाणार प्रशिक्षण : पंतप्रधान मोदी म्हणाले, "खेळांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. एक चांगला खेळाडू होण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. मला भारताच्या तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. कोणतं मूल कोणत्या खेळासाठी योग्य आहे हे ओळखा. क्रीडा परिसंस्थेचा विस्तार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. तरुण खेळाडूंना सरकारकडून प्रशिक्षणही दिलं जाईल."

ड्रग्जच्या समस्येचा सामना करण्यात खेळांची भूमिका : पुढं बोलताना मोदी म्हणाले, "जेव्हा आपण 2036 च्या ऑलिम्पिकबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला आतापासूनच खेळाडूंची तयारी सुरु करण्याची गरज आहे. कटू सत्य हे आहे की, भूतकाळात आपण ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या निम्म्या स्पर्धांमध्येही भाग घेतलेला नाही. जेव्हा मी खेळांबद्दल बोलतो, तेव्हा माझा अर्थ केवळ पदकं जिंकणं असा नसतो." तसंच आपले पॅरा-ॲथलीट हे याचं उत्तम उदाहरण आहेत की खेळ कसं आयुष्य बदलू शकतात आणि मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ड्रग्जच्या समस्येचा सामना करण्यात खेळ एक महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा :

  1. GCT Grand Finale: प्रज्ञानानंदची खराब सुरुवात; कारुआनानं जिंकला पहिला क्लासिकल गेम
  2. WAPL 2026: रामोजी ग्रुपनं सर्वाधिक बोली लावत विकत घेतला अमरावती संघ; कधी सुरु होणार ही लीग?
  3. Hockey World Cup: 1974 नंतर सर्वोत्तम कामगिरी करण्याची भारतीय संघाला संधी; जर्मनीविरुद्ध विजय मिळताच घडणार इतिहास