थायलंडविरुद्ध विजय मिळवताना पाकिस्तानला नाकीनऊ; गुणतालिकेत टीम इंडियाचा जलवा
पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघानं आपल्या आशिया कप मोहिमेची सुरुवात विजयानं केली, पण थायलंडनं त्यांना धक्का दिला.

Published : September 2, 2026 at 9:56 AM IST
दुबई Women's Asia Cup 2026 : पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघानं आपल्या आशिया कप मोहिमेची सुरुवात विजयानं केली, पण थायलंडनं त्यांना धक्का दिला. स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तानला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 119 धावा करता आल्या. लहान लक्ष्याचा पाठलाग करताना, थायलंडच्या फलंदाजीची कामगिरी 84 धावांवर मर्यादित राहिली. पाकिस्ताननं हा सामना 35 धावांनी जिंकला, पण या विजयात त्यांची फलंदाजी उघडी पडली. जर मुनीबा अलीनं 54 धावांची झुंजार खेळी केली नसती, तर पाकिस्तानला मोठा धक्का बसला असता.
Bowlers help Pakistan to a clinical win in their first contest of the Asia Cup 👏
— ICC (@ICC) September 1, 2026
📸: @ACCMedia1
📝: https://t.co/MGEGlb6EnY pic.twitter.com/Ou0k4Pnng2
पाकिस्तानच्या डगमगत असलेल्या डावाला मुनीबानं सावरलं : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. शवाल झुल्फिकार आणि गुल फिरोजा अवघ्या 6 धावांवर बाद झाल्या. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर मुनीबा अलीनं डावाची सूत्रं हाती घेतली. मुनीबानं 52 चेंडूंमध्ये 4 चौकारांसह 54 धावा केल्या. तिनं सदफ शमाससोबत 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करुन डाव सावरला. त्यानंतर तिनं उम्म-ए-हानीसोबत उपयुक्त धावा जोडल्या. मात्र 16 व्या षटकात मुनीबा 54 धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पुन्हा अडखळला.
अंतिम षटकांमध्ये तूबाची उपयुक्त खेळी : पाकिस्ताननं 90 धावांवर आपली सहावी विकेट गमावली आणि त्यांचा डाव 110 धावांवर अडकणार असं वाटत होते. मात्र, तूबा हसननं अंतिम षटकांमध्ये वेगानं धावा केल्या. तूबानं केवळ चार चेंडूंमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 12 धावा केल्या. तिच्या लहान पण स्फोटक खेळीमुळं पाकिस्तानला 119/9 पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. थायलंडकडून, थिपाचा पुत्थावोंग आणि सुलीपोर्न लामोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर फनिता मायानं दोन बळी घेतले.
The Women in Green are off to a winning start! Despite posting a below-par total, their potent spin attack once again came to the fore to get them over the line
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 1, 2026
Thailand bow out of the competition but they can hold their heads high and take plenty of positives from the campaign! pic.twitter.com/nXjU4IADAz
पाकिस्ताननं थायलंडला सुरुवातीलाच दिले धक्के : 120 धावांचं लक्ष्य गाठताना थायलंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी केवळ 6 धावांत दोन विकेट गमावल्या. नट्टाकन चंटम आणि नरुएमोल चायवाई यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. चायवाईनं 33 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या, तर चनिडा सुथिरुआंगला 24 चेंडूंमध्ये 25 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, आवश्यक धावगती वाढतच गेली आणि थायलंडसाठी लक्ष्य अधिकाधिक कठीण होत गेलं.
सादिया इक्बालची धारदार गोलंदाजी : पाकिस्तानच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सादिया इक्बालनं उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 11 धावा देऊन 3 बळी घेतले. नश्रा संधूनंही 4 षटकांत केवळ 6 धावा देत एक बळी घेतला. तुबा हसननं 2 बळी घेत थायलंडच्या डावावर आणखी दबाव टाकला. परिणामी थायलंड 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 84 धावाच करु शकला आणि पाकिस्ताननं 35 धावांनी सामना जिंकला. पाकिस्तानच्या विजयात मुनीबा अलीनं महत्त्वाची भूमिका बजावली. तिनं कठीण परिस्थितीत एक बाजू सांभाळली आणि 54 धावा करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तिच्या शानदार अर्धशतकासाठी मुनीबा अलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
विजयानंतर पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर : या विजयामुळं पाकिस्तानचे दोन गुण झाले असून, ते 'अ' गटाच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. भारतीय संघ दोन गुणांसह आघाडीवर आहे, परंतु त्यांचा नेट रन रेट +4.700 आहे, जो पाकिस्तानच्या +1.750 पेक्षा चांगला आहे. थायलंडनं तीन सामन्यांतून दोन गुण मिळवले असून त्यांचा नेट रन रेट -2.050 आहे, तर एक सामना गमावल्यामुळं हाँगकाँग सध्या गुणांशिवाय चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा :
- इंग्रजांनी केला वनडे इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग; आयरिश संघाविरुद्ध दमदार विजय
- तीन T20I सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; संजूचं संघात पुनरागमन तर वैभवलाही मिळालं स्थान
- फुटबॉल जगतातील एका युगाचा अंत! लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
Conclusion:

