ETV Bharat / sports

पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर; कर्णधाराच्या शतकी खेळीनं इंग्लंड सेमीफायनलमध्ये

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकनं 2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला.

Harry Brook
हॅरी ब्रूक (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 25, 2026 at 9:25 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पल्लेकेले Harry Brook : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकनं 2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला. त्यानं 50 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि 51 चेंडूत 100 धावा काढून बाद झाला. ब्रूक टी-20 विश्वचषकात शतक झळकावणारा पहिलाच कर्णधार ठरला. यापूर्वी कोणत्याही कर्णधारानं टी-20 विश्वचषकात शतक झळकावलं नव्हतं. ब्रूकनं या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. या शतकासोबतच ब्रूकनं इतर अनेक विक्रमही प्रस्थापित केले. त्याच्या या शतकाच्या बळावर इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं, तर पाकिस्तान विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे.

हॅरी ब्रूकनं केली क्रिस गेलची बरोबरी : टी-20 विश्वचषकात ब्रूकनं झळकावलेलं शतक संयुक्तपणे दुसरं सर्वात जलद शतक आहे. या बाबतीत त्यानं क्रिस गेलची बरोबरी केली. या सामन्यात ब्रूकनं 50 चेंडूत शतक झळकावलं, तर 2007 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिस गेलनं 50 चेंडूत शतक झळकावलं होतं. टी-20 विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रमही क्रिस गेलच्या नावावर आहे. 2016 च्या टी-20 विश्वचषकात गेलनं इंग्लंडविरुद्ध फक्त 47 चेंडूत शतक झळकावलं होतं.

टी-20 विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज :

  • 47 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2016
  • 50 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2007
  • 50 चेंडू - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, 2026*
  • 51 चेंडू - ब्रँडन मॅक्युलम विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, 2012

हॅरी ब्रूकचा आणखी एक विक्रम : हॅरी ब्रूकनं टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही केला आहे. 2010 च्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध 98 धावा काढत ख्रिस गेल यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंडचा पार्टटाईम कर्णधार लोर्कन टकरनं याच विश्वचषकात कोलंबोमध्ये ओमानविरुद्ध नाबाद 94 धावा काढल्या. यादीत रोहित शर्माचा चौथा क्रमांक लागतो. 2024 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितनं कर्णधार म्हणून 92 धावा काढल्या. या सामन्यात ब्रूकनं शतक ठोकून या विक्रमाची बरोबरी केली.

टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा :

  • 100 धावा - हॅरी ब्रुक विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, 2026*
  • 98 धावा - ख्रिस गेल विरुद्ध भारत, ब्रिजटाऊन, 2010
  • 94* धावा - लोर्कन टकर विरुद्ध ओमान, कोलंबो एसएससी, 2026
  • 92 धावा - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाऊन, 2024

पाकिस्तानचं आव्हान संपल्यात जमा : सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास इंग्लंडनं पाकिस्तानला दोन विकेट्सनं हरवून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करुन मोठा विजय मिळवला. इंग्लंडसाठी या सामन्याचा खरा हिरो हॅरी ब्रूक होता. त्यानं शानदार शतक झळकावले आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला. यासह, इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धचा 100 टक्के विजयी विक्रम कायम ठेवला आहे. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत आणि इंग्लंडनं सर्व सामने जिंकले आहेत.

हेही वाचा :

  1. ICC महिला T20 विश्वचषक 2026 : चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना
  2. 0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम
  3. अक्षर पटेलला प्लेइंग 11 मधून वगळल्यावरुन संघ व्यवस्थापनावर टीका; रविचंद्रन अश्विननं चांगलंच सुनावलं