Norway Chess: भारतासाठी ऐतिहासिक दिवस! आर. प्रज्ञानानंदचा अव्वल खेळाडू कार्लसेनला धक्का; तर दिव्याचीही विजयी हॅटट्रिक
भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानानंदनं 2024 मध्ये मॅग्नस कार्लसेनला पहिल्यांदा क्लासिकल सामन्यात पराभूत केलं होतं. आता, आर. प्रज्ञानानंदनं हीच कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे.

Published : May 28, 2026 at 10:15 AM IST
Norway Chess 2026 : भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानानंदनं 2024 मध्ये मॅग्नस कार्लसेनला पहिल्यांदा क्लासिकल सामन्यात पराभूत केलं होतं. आता, आर. प्रज्ञानानंदनं हीच कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. यावेळी त्यानं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसेनला पराभूत केलं. तिसऱ्या फेरीपूर्वी या भारतीय ग्रँडमास्टरकडे फक्त एक गुण होता. क्लासिकल बुद्धिबळात प्रज्ञानानंदकडून कार्लसेनला इतका मोठा पराभव पत्करावा लागेल, अशी अपेक्षा फार कमी लोकांनी केली असेल.
WHAT A GAME! Praggnanandhaa defeats World #1 Magnus Carlsen 🤯😱💪#NorwayChess pic.twitter.com/5RMgBF5Z74
— Norway Chess (@NorwayChess) May 27, 2026
44 व्या चालीवर कार्लसेनकडून चूक : पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना, 20 वर्षीय आर. प्रज्ञानानंदनं पाच वेळच्या विश्वविजेत्याला 46 चालींमध्ये पराभूत केलं. 44 व्या चालीवर मोठी चूक केल्यानंतर, कार्लसेन जास्त वेळ टिकू शकला नाही आणि दोन चालींनंतर त्यानं पराभव स्वीकारला. या विजयामुळं आर. प्रज्ञानानंदचे 4.5 गुण झाले असून तो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोचा पराभव केला, पण दुसऱ्या फेरीत तो अलीरेझा फिरौझाकडून हरला.
Oops, he did it again! 🔥🇮🇳#NorwayChess pic.twitter.com/7u54vE4GEZ
— Norway Chess (@NorwayChess) May 27, 2026
मॅग्नस कार्लसेनचा स्पर्धेतील दुसरा पराभव : बुद्धिबळाच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या मॅग्नस कार्लसेनची आतापर्यंत त्याच्या घरच्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी झाली आहे. पहिल्या फेरीत त्याला फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझाकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यानं टायब्रेकरमध्ये व्हिन्सेंट केमरचा पराभव केला. आता, तिसऱ्या फेरीत चेन्नईच्या खेळाडूनं त्याला हरवलं आहे. 1.5 गुणांसह तो गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे. विशेष म्हणजे नॉर्वे चेसची सुरुवात 2013 मध्ये झाली. मॅग्नस कार्लसेननं आतापर्यंतच्या 13 क्लासिक स्पर्धांपैकी सात स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या सात वर्षांत तो सहा वेळा विजेता ठरला आहे.

दिव्याचीही विजयी हॅटट्रिक : दुसरीकडे नॉर्वे चेस विमेन्स स्पर्धेत नागपूरकर दिव्या देशमुखनं सलग तिसऱ्यांदा आर्मागेडॉन जिंकल्यानं भारतीय बुद्धिबळ चाहत्यांसाठी हा दिवस अधिक आनंदाचा ठरला. या एलिट स्तरावर पदार्पण करणारी नागपूरची ही 20 वर्षीय खेळाडू पूर्णपणे अपराजित आहे. तिनं पहिल्या फेरीत महिला विश्वविजेती जू वेनजुन, दुसऱ्या फेरीत भारताची अव्वल महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि आता सलग तीन वेळा महिला विश्व ब्लिट्झ चॅम्पियन राहिलेली बिबिसारा असाउबायेवा अशा दिग्गजांना आतापर्यंत पराभूत केलं आहे.
🇮🇳 DIVYA wins the Armageddon against BIBISARA.
— Norway Chess (@NorwayChess) May 27, 2026
3 Armageddons=3 match wins for Divya.
📷 Norway Chess / Michal Walusza#NorwayChess pic.twitter.com/PofMDOw38L
दिव्याचे सर्व डावपेच यशस्वी : काळ्या सोंगट्यांनी खेळताना, दिव्यानं बुधवारी बिबिसाराचे दोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावले, प्रथम क्लासिकल सामन्यात आणि नंतर टायब्रेकमध्ये. क्लासिकल गेममध्ये भक्कम बरोबरी साधल्यानंतर, आर्मागेडॉन निर्णायक गेममध्ये दिव्याकडे बरोबरी साधण्याचं मानसिक वर्चस्व होतं, ज्यामुळं सामना जिंकण्यासाठी तिला काळ्या सोंगट्यांनी खेळताना फक्त बरोबरी साधण्याची गरज होती. टायब्रेकमध्ये, बिबिसारानं लवचिक इंग्लिश सेटअपचा अवलंब केला, परंतु दिव्यानं सहजपणे बरोबरी साधली आणि त्यानंतर 25 b4 या चालीवर मध्यभागी जोरदार हल्ला चढवून पुढाकार घेतला. त्यानंतर तिनं 26 Bxe4 पासून सुरु होणारी एक निर्दोष डावपेचांची मालिका यशस्वीपणे पार पाडली.
हेही वाचा :

