ETV Bharat / sports

दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ जाहीर; जम्मू-काश्मीरच्या सहा खेळाडूंना संघात स्थान

2026-27 च्या दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीनं 15 सदस्यीय संघाची निवड केली असून, या हंगामात कन्हैया वाधवान कर्णधार असेल.

north zone
दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ जाहीर (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 4, 2026 at 5:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : 2026-27 च्या दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीनं 15 सदस्यीय संघाची निवड केली असून, या हंगामात कन्हैया वाधवान कर्णधार असेल. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचाही उत्तर विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दिल्लीच्या यश धुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनीलाही उत्तर विभागाच्या संघात स्थान मिळालं आहे. स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात उत्तर विभागाचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाशी होईल.

उत्तर विभागाच्या संघात जम्मू आणि काश्मीरचे सहा खेळाडू : गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेल्या जम्मू आणि काश्मीर संघानं उत्तर विभागाच्या संघात वर्चस्व गाजवलं आहे. रणजी संघातील सहा खेळाडूंचा दुलीप ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार वधावन व्यतिरिक्त, संघात सलामीवीर कामरान इक्बाल, मधल्या फळीतील फलंदाज अब्दुल समद, डावखुरा फिरकी अष्टपैलू आबिद मुश्ताक आणि वेगवान गोलंदाज सुनील कुमार व युधवीर सिंग यांचाही समावेश आहे.

गेल्या रणजी हंगामात अब्दुल समदची दमदार कामगिरी : गेल्या रणजी हंगामात, अब्दुल समद जम्मू आणि काश्मीरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानं 15 डावांमध्ये 57.53 च्या प्रभावी सरासरीनं 748 धावा केल्या. वधावननंही चांगली कामगिरी करत 13 डावांमध्ये 36.46 च्या सरासरीनं 474 धावा केल्या. कामरान इक्बालचाही हंगाम दमदार ठरला, त्यानं कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात शानदार नाबाद 160 धावा केल्या. या प्रभावी कामगिरीमुळं त्याची पहिल्यांदाच दुलीप करंडक संघात निवड झाली आहे. याव्यतिरिक्त, आबिद मुश्ताकला फिरकी अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यानं या हंगामात 445 धावा केल्या आणि 20 बळी घेतले. तो संघात निशांत सिंधूसोबत फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावेल.

अंशुल कंबोजचाही संघात समावेश : उत्तर विभागाच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व अर्शदीप करेल, त्याच्यासोबत जम्मू आणि काश्मीरचे वेगवान गोलंदाज युधवीर आणि सुनील कुमार असतील. हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजही या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाचा भाग असेल. गेल्या रणजी करंडक हंगामातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आकिब नबीचा या संघात समावेश नाही. तो त्यावेळी भारतीय संघासोबत श्रीलंकेत असेल. उत्तर विभागाचा पहिला सामना 23 ऑगस्ट रोजी बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये पश्चिम विभागाविरुद्ध होईल.

दुलीप ट्रॉफी 2026 साठी उत्तर विभागाचा संघ : कन्हैया वाधवन (कर्णधार, यष्टिरक्षक), सनत सांगवान, कामरान इक्बाल, यश धुल, आयुष डोसेजा, अब्दुल समद, आयुष बडोनी (उपकर्णधार), निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंह, निखिल कश्यप.

हेही वाचा :

  1. टीम इंडिया श्रीलंकेत खेळणार सराव सामना; कधी आणि किती वाजता होणार सुरु?
  2. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचं पुनरागमन; बाबर आझम 4 वर्षांनी शतकाच्या उंबरठ्यावर
  3. हार्दिक पांड्या ते जसप्रीत बुमराह... IPL मध्ये सर्व सामने खेळलेले खेळाडू टीम इंडियासाठी अनफिट?