ETV Bharat / sports

न्यूझीलंडला श्रीलंकेकडून सेमीफायनलचं तिकिट 'गिफ्ट'; पाकिस्तान विजय मिळवूनही बाहेर

2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्ध सुपर-8 सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला, परंतु स्पर्धेतील त्यांची मोहीम संपुष्टात आली.

NZ Qualify for Semifinal
न्यूझीलंडला श्रीलंकेकडून सेमीफायनलचं तिकिट गिफ्ट (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 28, 2026 at 11:31 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पल्लेकेले NZ Qualify for Semifinal : 2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्ध सुपर-8 सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला, परंतु स्पर्धेतील त्यांची मोहीम संपुष्टात आली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांत 212 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना श्रीलंकेला 147 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखायचं होतं, परंतु ते तसं करु शकले नाहीत. या विजयासह पाकिस्तान मायदेशी परतला. न्यूझीलंडनं त्यांच्या नेट रन रेटमुळं उपांत्य फेरीत स्थान मिळवले, त्यामुळं स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने आता भारतात खेळले जातील हे नक्की झालं आहे.

पाकिस्तानचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा खराब : 2026 च्या टी-20 विश्वचषकात, पाकिस्तानला इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेसह सुपर-8 च्या गट 2 मध्ये स्थान देण्यात आलं. त्यांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होता, परंतु तो पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचा त्यांच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडशी सामना झाला, जिथं त्यांना 2 विकेटनं पराभव पत्करावा लागला. दरम्यान, न्यूझीलंडनं त्यांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेचा 61 धावांनी पराभव करुन त्यांच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय सुधारणा केली. त्यानंतर न्यूझीलंडनं इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना 4 विकेट्सनं गमावला, परंतु त्यांचा नेट रन रेट 1.390 राहिला.

पाकिस्तानचा विजय मात्र आव्हान संपुष्टात : उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी, पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना 65 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकानं जिंकणं आवश्यक होतं, तरच त्यांचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला असता. मात्र, ते असं करण्यात अपयशी ठरले आणि फक्त 5 धावांनी विजय मिळवला. परिणामी, तीन गुण असूनही, पाकिस्तानचा नेट रन रेट -0.123 वर राहिला, ज्यामुळं त्यांना तिसऱ्या स्थानावर राहून मायदेशी परतावं लागलं.

उपांत्य फेरीसाठी तीन संघ निश्चित : आता तीन संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड गट 2 मधून पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिका गट 1 मधून उपांत्य फेरीत आहे. चौथा संघ रविवारी वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळताना निश्चित होईल. या सामन्याचा विजेता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

हेही वाचा :

  1. जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच रणजी चॅम्पियन; 91 वर्षांत कोणत्या संघानं कधी आणि किती वेळा जिंकली स्पर्धा, वाचा यादी
  2. जम्मू आणि काश्मीरनं रचला इतिहास; दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी
  3. वानखेडे स्टेडियमवर आणखी एका दिग्गजाच्या नावानं स्टँड; तीन गेट्सना खेळाडूंची नावं