ETV Bharat / sports

भारतात कीवींनी अनेक वर्षांपासून जिंकला नाही वनडे सामना; कसा आहे दोन्ही संघांचा विक्रम?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ODI मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

IND vs NZ ODI Series
भारतात कीवींनी अनेक वर्षांपासून जिंकला नाही वनडे सामना (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 2, 2026 at 11:24 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मागील वनडे मालिका 2-1 नं जिंकली. तेव्हापासून संघाचे मनोबल उंचावले आहे. आता, टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे.

न्यूझीलंडनं भारताविरुद्ध शेवटचा वनडे सामना कधी जिंकला? : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 120 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतानं 62 जिंकले आहेत. न्यूझीलंडनं 50 जिंकले आहेत. सात सामने निकालाशिवाय संपले आहेत. शिवाय, एक सामना बरोबरीत सुटला. वरील आकडेवारीनुसार, वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत वरचढ असल्याचं दिसतं. गेल्या नऊ वर्षांपासून न्यूझीलंडनं भारतीय भूमीवर भारताविरुद्ध एकही वनडे सामना जिंकलेला नाही. न्यूझीलंडनं भारताविरुद्ध शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये जिंकला होता. हा सामना वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता, जिथं कीवींनी 6 विकेट्सनं विजय मिळवला होता. तेव्हापासून, कीवी संघ भारतीय भूमीवर भारताविरुद्ध जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून निवड होणार : शुभमन गिलची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवड होण्याची शक्यता आहे, कारण 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळं, त्याचं लक्ष आता वनडे स्वरुपावर असेल. दुखापतीमुळं तो मागील वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्यानंतर केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, न्यूझीलंडनं आधीच आपला संघ जाहीर केला आहे.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ :

मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदि अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फाउलकेस, मिच हे, काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचं वेळापत्रक :

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला वनडे सामना, 11 जानेवारी, वडोदरा
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा वनडे सामना, 14 जानेवारी, राजकोट
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा वनडे सामना, 18 जानेवारी - इंदौर

हेही वाचा :

  1. 2026 सुरु होताच दिग्गजानं केली निवृत्तीची घोषणा; अ‍ॅशेस मालिका सुरु असताना अचानक निर्णय
  2. विजय हजारे ट्रॉफीत बंगालचा दणदणीत विजय : जम्मू-कश्मीरला अवघ्या 63 धावांत गुंडाळलं, शमीची चालली जादू
  3. SA20 मध्ये पहिल्यांदाच रंगला सुपर ओव्हरचा थरार; सुपर किंग्जनं मिळवला विजय