नामिबियानं आफ्रिकेला पुन्हा हरवलं; 'बेबी एबी'ची जबरदस्त खेळी व्यर्थ
मायदेशात खेळल्या जात असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील पहिल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन नामिबिया क्रिकेट संघानं आपला अपराजित विक्रम कायम ठेवला.

Published : August 29, 2026 at 10:40 AM IST
विंडहोक NAM Beat SA By 18 Runs : मायदेशात खेळल्या जात असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील पहिल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन नामिबिया क्रिकेट संघानं आपला अपराजित विक्रम कायम ठेवला. विंडहोक इथं खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नामिबियानं प्रथम फलंदाजी करत 163 धावा केल्या आणि नंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर लक्ष्याचा बचाव करत एक संस्मरणीय विजय नोंदवला. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेला नामिबियाविरुद्ध अद्याप एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही.
Hosts Namibia script a memorable win over South Africa to kickstart a landmark tri-series 👏
— ICC (@ICC) August 28, 2026
📝: https://t.co/qQEagp1jew
For more LIVE action, tune in to https://t.co/MHHfZPzf4H (in select regions) 📺 pic.twitter.com/kOb5CIIgJZ
नामिबियाची उत्कृष्ट सुरुवात : नामिबियानं दमदार सुरुवात केली. जॅन फ्रायलिंक आणि लॉरेंट स्टीनकॅम्प यांनी पॉवरप्लेमध्ये पहिल्या विकेटसाठी 57 धावा आणि 10 षटकांत 84 धावा जोडल्या. 13 धावांवर असताना फ्रायलिंकचा झेल सुटल्यानं त्याला जीवदान मिळाले आणि त्यानं या संधीचं सोनं करत अर्धशतक झळकावलं. मात्र, कर्णधार ब्योर्न फॉर्च्युन (2/17) आणि प्रेनेलन सुब्रायन (3/32) या फिरकी गोलंदाजांच्या जोडीनं नामिबियाच्या मधल्या फळीला उद्ध्वस्त केलं. नामिबियानं अवघ्या 79 धावांत आपल्या शेवटच्या नऊ विकेट गमावल्या आणि केवळ 163 धावाच केल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुथो सिपामला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं दुसऱ्याच षटकात सामन्यातून बाहेर झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला खिंडार : नामिबियानं दिलेलं 164 धावांचं लक्ष्य गाठताना, नामिबियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकला. वरिष्ठ गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमन आणि जेजे स्मिट यांच्यासोबत 21 वर्षीय जॅक ब्रासेल आणि 18 वर्षीय मॅक्स हिंगो यांनी अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी केली. जॉर्डन हरमन, लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि टोनी डी झोर्झी यांच्या सुरुवातीच्या विकेट्समुळं दक्षिण आफ्रिकेची अवस्था 39/3 अशी झाली.
Edge-of-your-seat finish brewing in Windhoek as South Africa and Namibia battle it out in the tri-series opener 👊
— ICC (@ICC) August 28, 2026
Tune in to watch the LIVE action in select regions on https://t.co/MHHfZPzf4H 📺 pic.twitter.com/ra0530fvGV
डेवाल्ड ब्रेविसचं झुंजार अर्धशतक व्यर्थ : एका बाजूनं विकेट्स पडत असताना, 'बेबी एबी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसनं आपल्या धडाकेबाज खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातील आशा जिवंत ठेवल्या. ब्रेविसनं 50 चेंडूंमध्ये शानदार 75 धावा केल्या, त्याला पदार्पण करणाऱ्या डुआन जॅनसेनकडून फारशी साथ मिळाली नाही, ज्यानं 25 धावा केल्या. जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकांमध्ये जलद धावांची गरज होती, तेव्हा रुबेन ट्रम्पेलमननं ब्रेविसला बाद करुन सामना नामिबियाच्या बाजूनं वळवला.
शेवटच्या षटकांमध्ये नामिबियाची उत्कृष्ट गोलंदाजी : कर्णधार गेर्हार्ड इरास्मसनं 19व्या षटकात फोर्टुइनची विकेट घेतली, तो फक्त 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर जे. जे. स्मितनं शेवटच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करत सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळून नामिबियाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
हेही वाचा :

