क्रिकेटच्या पंढरीत महाराष्ट्राची लेक रचणार इतिहास! वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताची कन्या, मुंबईकर वृंदा राठी, अंतिम सामन्यात एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

Published : July 5, 2026 at 11:09 AM IST
लंडन Vrinda Rathi Umpire : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाचा प्रवास गट फेरीतच संपला असला तरी, भारताची कन्या, मुंबईकर वृंदा राठी, अंतिम सामन्यात एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. आज 5 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता क्रिकेटच्या पंढरीत होणाऱ्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे महिला संघ आमने-सामने येतील. आयसीसीनं या सामन्यासाठी सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली असून, त्यात भारताची वृंदा राठी मैदानातील अंपायर म्हणून जबाबदारी पार पाडेल तर दुसरी अंपायर जॅकलिन विल्यम्स असेल.
The @emirates ICC International Panel of Match Officials to officiate the Women's #T20WorldCup Final have been named 🏆https://t.co/L4jvAL6DKD
— ICC (@ICC) July 3, 2026
महिला टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करणारी वृंदा पहिली भारतीय : मध्यमगती गोलंदाज असलेली वृंदा राठी चार वर्षे मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाकडून खेळली, पण तिला वरिष्ठ स्तरावर खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. यानंतर, वृंदानं अंपायरिंग म्हणून कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत ती त्यात बरीच यशस्वी ठरली आहे. विश्वचषक अंतिम सामन्यात मैदानावर अंपायरिंग करणारी वृंदा राठी ही केवळ दुसरी भारतीय पंच ठरेल. यापूर्वी, भारताचे राम बाबू गुप्ता यांनी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 1987 च्या पुरुष वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात अंपायरिंग केली होती. या सामन्यात वृंदा राठी आणि जॅकलिन विल्यम्स मैदानावर अंपायरिंग करतील, तर किम कॉटन तिसऱ्या पंच असतील. भारताच्या जी.एस. लक्ष्मी, ज्यांनी यापूर्वी 2023 आणि 2024 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, त्या या सामन्यातही सामनाधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळतील.
वृंदा यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये अंपायरिंग करण्याचा अनुभव : भारतीय महिला अंपायर वृंदा राठीबद्दल बोलायचं झाल्यास, तिला तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुभव आहे. 2023 मध्ये मुंबईत भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील कसोटी सामन्यात अंपायरिंग करणारी ती पहिली भारतीय कसोटी अंपायर ठरली. आतापर्यंत वृंदानं 20 वनडे सामन्यांमध्ये, तर महिला टी-20 आंतरराष्ट्रीय 77 सामन्यांमध्ये अंपायरिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
हेही वाचा :

