IND vs SA: आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती; टीम इंडियाचा मोठा पराभव

Published : February 22, 2026 at 4:59 PM IST
|Updated : February 22, 2026 at 10:19 PM IST
अहमदाबाद IND vs SA Live : अहमदाबाद IND vs SA Match : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर डेव्हिड मिलरच्या दमदार अर्धशकाच्या बळावर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या.
LIVE FEED
51 धावांवर 5 बाद, भारतीय फलंदाजी गडगडली!
वॉशिंग्टन सुंदर आणि सुर्यकुमार यादव बाद झाल्यानं भारतीय फलंदाजी ढेपाळली आहे. पाच खेळाडू बाद झाल्यानं भारताचा डाव गडगडला आहे.
अभिषेक शर्मा 15 धावा काढून झेलबाद
अभिषेक शर्मा हा 12 चेंडूत 15 धावा काढून झेलबाद झाला. त्यामुळे भारतीय फलंदाजीला मोठा धक्का बसला.
इशाननंतर तिलक वर्मादेखील आऊट, भारताला दुसरा धक्का
इशान आऊट झाल्यानंतर भारताला दुसरा बसला आहे. अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी आलेला तिलक वर्मादेखील तंबूत परतला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या 20 षटकांत 187 धावा
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर डेव्हिड मिलरच्या दमदार अर्धशकाच्या बळावर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या.
डेव्हिड मिलर बाद
दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का बसला तो डेव्हिड मिलरच्या रुपात. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तिलक वर्मानं त्याचा झेल घेतला. मिलरनं 35 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली. आफ्रिकन संघाची धावसंख्या 5 बाद 152 आहे.
मिलरचं दमदार अर्धशतक
सुरुवातील 3 विकेट गेल्यानं संकटात सापडलेल्या आफ्रिकेकडून मिलरनं 200 च्या स्ट्राईक रेटनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 26 चेंडूत फिफ्टी ठोकली.
देवाल्ड ब्रेव्हिस बाद
देवाल्ड ब्रेव्हिस एका चांगल्या खेळीनंतर बाद झाला. त्याला शिवम दुबेनं बाद केलं. ब्रेव्हिसनं 29 चेंडूत 45 धावांची दमदार खेळी केली, त्यात तीन चौकार आणि तीन षटकार मारले. अभिषेक शर्मानं त्याचा झेल घेतला.
आफ्रिकेच्या 12व्या षटकांत 100 धावा
सुरुवातीला तीन विकेट लागोपाठ पडल्यानंतर मिलर-ब्रेविसनं आफ्रिकेचा डाव सावरला आहे. संघाच्या 12व्या षटकांत 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
वरुणच्या षटकात चोपल्या 17 धावा
भारताकडून वरुण चक्रवर्तीनं टाकलेल्या 9व्या षटकात मिलर-ब्रेविसनं दोन षटकार आणि एका चौकारासह 17 धावा केल्या. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी आहे, संघाच्या 10 षटकांत 84 धावा झाल्या आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
दक्षिण आफ्रिकेनं 50 धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत सात षटकं खेळली गेली आहेत. तीन विकेट पडल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत, भागीदारी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. पॉवरप्ले संपल्यानंतर आता फिल्ड मोकळी झाली आहे.
पॉवरप्ले भारताच्या नावावर
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पॉवरप्ले मध्ये त्यांच्या 6 षटकांत 41 धावा झाल्या असून 3 विकेट पडल्या आहेत.
चार षटकांत टॉप-3 फलंदाज आउट
जसप्रीत बुमराहनं आणखी एक विकेट घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेनं आता तीन विकेट गमावल्या आहेत, त्यापैकी दोन बुमराहनं आणि एक अर्शदीपनं केली आहे. बुमराहनं आता रायन रिकेल्टनलाही बाद केलं आहे. रिकेल्टनला सात चेंडूत फक्त सात धावा करता आल्या.
आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर तंबूत
भारताने दोन विकेट घेतल्या आहेत. प्रथम डी कॉक बाद झाला आणि आता कर्णधार आणि सलामीवीर एडन मार्कराम देखील बाद झाला आहे. त्याला अर्शदीप सिंगनं बाद केलं. हार्दिक पांड्यानं एक शानदार झेल घेतला. मार्करामनं सात चेंडूत चार धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या सध्या चार षटकांनंतर 20 धावा आहे.
10 धावांवर पहिली विकेट
दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट पडली आहे. जसप्रीत बुमराहनं त्याच्या डावातील पहिल्या आणि दुसऱ्या षटकात डी कॉकला बाद केलं. त्यानं सहा चेंडूत फक्त सात धावा काढल्या, ज्यामध्ये एक चौकार होता. दोन षटकांनंतर, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या एक बाद 10 आहे.
सामन्यासाठी दोन्ही संघ
दक्षिण अफ्रीका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रयान रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागीसो रबाडा, लुंगी एनगिडी.
भारत : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टॉस
सुपर-8 च्या या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी आफ्रिका संघात चार बदल करण्यात आले आहेत.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्कराम थोड्याच वेळात नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता होईल.
या सामन्यात हवामान कसं असेल
टीम इंडियानं आतापर्यंतचे सर्व सामने प्रभावी निकालांसह जिंकले आहेत, अगदी पाकिस्तानसारख्या संघालाही सहज पराभूत केलं आहे. परंतु यावेळी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघासमोर हा सामना रोमांचक होणार आहे. शनिवारचा पहिला सुपर-8 सामना (पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड) पावसामुळं रद्द करण्यात आला. मात्र, आजचा सामना भारतात खेळवला जाईल आणि चांगली बातमी अशी आहे की पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा
टी-20 मध्ये हेड टू हेड सामन्यांच्या विक्रमात भारताचा वरचष्मा आहे, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 35 पैकी 21 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं फक्त 13 सामने जिंकले आहेत, त्यापैकी एक सामना अनिर्णीत राहिला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात, भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सातपैकी पाच सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा समावेश आहे, तर दक्षिण आफ्रिकेनं फक्त दोन विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं अद्याप नॉकआउट सामन्यात भारताला पराभूत केलेलं नाही.
अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल
अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर, नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजांसाठी चांगलं मानलं जातं. सुरुवातीला ते गोलंदाजांना अनुकूल असते, परंतु जसजसे वेळ जातो तसतसं ते मंदावते, ज्यामुळं फलंदाजांना फायदा होतो. याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एक रोमांचक डबल सुपर ओव्हर सामना आधीच खेळला गेला आहे.

