SA vs NZ: कीवींचा दणदणीत विजय; 43 चेंडू राखत फायनलमध्ये प्रवेश

Published : March 4, 2026 at 5:05 PM IST
|Updated : March 4, 2026 at 9:45 PM IST
कोलकाता SA vs NZ SemiFinal : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्य सामना आज, बुधवार (1 मार्च) रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स इथं दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात कीवी संघानं आरामात विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात फिन ऐलनच्या वादळी शतकाच्या बळावर एकहाती विजय मिळवला.
LIVE FEED
दोन्ही सलामीवीरांची आक्रमक अर्धशतकं
170 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांनी वादळी सुरुवात करत अर्धशतकं झळकावली. टिम सायफर्टनं 28 तर फिन ऐलननं 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
पॉवरप्लेमध्ये ठोकल्या 84 धावा
170 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं आक्रमक सुरुवात केली आहे. त्यांच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये 84 धावा ठोकत सामना पुर्णपणे त्यांच्या बाजूनं झुकवला आहे.
न्यूझीलंडनं ओलांडला 50 धावांचा टप्पा
170 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 50 धावांचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज आतापर्यंत किवी सलामी जोडीसमोर कमकुवत राहिले आहेत. त्यांना धावा रोखता येत नाहीत किंवा विकेट घेता येत नाहीत.
किवीजचा डाव सुरु झाला
न्यूझीलंडचा डाव सुरु झाला आहे. टिम सायफर्ट आणि फिन ऐलन डावाची सुरुवात करत आहेत. संघानं दोन षटकांत 20 धावा केल्या आहेत.
आफ्रिकेची आव्हानात्मक मजल
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या. संघाकडून मार्को जानसननं वादळी अर्धशतक झळकावत नाबाद 55 धावा केल्या.
लॉकी फर्ग्यूसननं ट्रिस्टन स्टब्स-मार्को जानसनची जोडी तोडली
लॉकी फर्ग्यूसननं 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला बाद करत ट्रिस्टन स्टब्स-मार्को जानसनची जोडी तोडली. या दोघांमध्ये 73 धावांची भागीदारी झाली होती. ट्रिस्टन स्टब्स 29 धावांवर आउट झाला.
18व्या षटकात 22 धावा
ट्रिस्टन स्टब्स-मार्को जानसननं निशमनं टाकलेल्या 18व्या षटकात 22 धावा ठोकल्या. यासह आफ्रिकेच्या धावा 150 पार झाल्या आहेत.
ट्रिस्टन स्टब्स-मार्को जानसनची जोडी जमली
प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेला 11व्या षटकात पाचवा धक्का बसल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स-मार्को जानसन यांनी डाव सावरला आहे. आफ्रिकेची धावसंख्या त्यांनी 120 पार पोहोचवली.
आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये
आफ्रिकेला 11व्या षटकात डिवाल्ड ब्रेविसच्या रुपात पाचवा धक्का बसला. डिवाल्ड ब्रेविस चांगली ऱलंदाजी करत होता. मात्र तो 27 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. जेमी निशमनं त्याची विकेट घेतली.
आफ्रिकेचा अर्धा डाव संपला
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या 10 षटकांनंतर 77 धावांवर 4 विकेट पडल्या आहे. एका बाजूनं मात्र ब्रेविस फटकेबाजी करत आहे.
आफ्रिकेची तिसरी विकेट
कर्णधार ऐडन मारक्रमच्या रुपात आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. तो 21 चेंडूत 18 धावांची संथ खेळी करुन बाद झाला. रचिन रवींद्रनं त्याची विकेट घेतली.
पॉवरप्लेअखेर आफ्रिकेच्या 48 धावा
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्याच षटकात लागोपाठ 2 विकेट गेल्यानं आफ्रिकन संघ संकाटत सापडला होता. मात्र यानंतर मारक्रम-ब्रेविसनं संघाचा डाव सावरला.
दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला दोन धक्के
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन धक्के बसले. सलामीवीर क्विंटन डी कॉक 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर रियन रिकेल्टनंही शून्यावर बाद झाला. कोल मॅककॉन्चीनं दोन्ही विकेट घेतल्या.
न्यूझीलंडची प्लेइंग 11
टिम सायफर्ट (विकेटकीपर), फिन एलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डेरिल मिचेल, जिम्मी नीशम, मिचेल सेंटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन
सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11
ऐडन मारक्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रियान रिकेल्टन, डिवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एंगिडी.
न्यूझीलंडनं जिंकला टॉस
पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजी करणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
कोलकाताची खेळपट्टी कशी असेल
कोलकाता येथील मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळलेला शेवटचा सामना फलंदाजीसाठी खूपच अनुकूल ठरला. त्यामुळं या सामन्यातही अशीच खेळपट्टी अपेक्षित आहे. त्या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दुसऱ्या डावात दव पडण्याचा फायदा घेण्याच्या आशेनं, जे प्रभावी ठरले. उपांत्य फेरीच्या सामन्यात, नाणेफेक जिंकणारा संघ दव पडण्याच्या घटकाला लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून 200 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग सहज करता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ
दक्षिण आफ्रीका : एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रियान रिकेल्टन, डिवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्टजे, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, मार्को जानसेन, केशव महाराज, जेसन स्मिथ.
न्यूजीलंड : टिम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डेरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोन्ची, मॅट हेनरी, ईश सोढी, लॉकी फर्ग्यूसन, जेकब डफी, जेम्स नीशम, काइल जेमीसन, डेवॉन कॉनवे.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा?
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 12 सामने दक्षिण आफ्रिकेनं जिंकले आहेत, तर 7 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ पाच वेळा एकमेकांसमोर आले आहेत, प्रत्येक वेळी दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला आहे.

