IPL दरम्यान कीवी फलंदाजानं 48 ओव्हर फलंदाजी करत ठोकल्या 186 धावा; एकटाच पडला प्रतिस्पर्धी संघावर भारी
आर्यलँड आणि न्यूझीलँड क्रिकेट संघात येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव चार दिवसीय कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं आपलं स्थान मजबूत केलं आहे.

Published : May 29, 2026 at 10:45 AM IST
बेलफास्ट Tom Blundell : आर्यलँड आणि न्यूझीलँड क्रिकेट संघात येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव चार दिवसीय कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं आपलं स्थान मजबूत केलं आहे. यष्टीरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेलच्या 186 धावांच्या शानदार मॅरेथॉन खेळीच्या जोरावर, कीवी संघानं आपला पहिला डाव 8 गडी बाद 490 धावांवर घोषित केला. पहिल्या दिवशी एक वेळी, 4 गडी बाद केवळ 86 धावांवर असताना, ब्लंडेलनं केवळ न्यूझीलंडला संकटातून बाहेर काढलं नाही, तर रचिन रवींद्रसोबत द्विशतकी भागीदारी करुन संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
Tom Blundell shines in Belfast with a brilliant century 💫
— ICC (@ICC) May 27, 2026
📝: https://t.co/ZXKloZSqFB pic.twitter.com/oq6YNZyMpp
ब्लंडेल आणि रचिन रवींद्र यांची द्विशतकी भागीदारी : सामन्याच्या पहिल्या दिवशी, आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सुरुवातीला योग्य ठरला. कीवी संघाचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर, टॉम ब्लंडेल आणि रचिन रवींद्र यांनी सूत्रं हाती घेतली आणि 330 चेंडूंमध्ये पाचव्या विकेटसाठी 217 धावांची शानदार भागीदारी रचली. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, हॅरी टेक्टरनं रचिन रवींद्रला बाद करुन ही भागीदारी तोडली. न्यूझीलंडनं पहिला दिवस 361/5 अशा धावसंख्येवर संपवला.
Twin centuries helped New Zealand make early inroads on Day 1 in Belfast 👊
— ICC (@ICC) May 27, 2026
📝: https://t.co/ZXKloZSqFB | 📸: @BLACKCAPS pic.twitter.com/iUV0UEm3B9
ब्लंडेलचं द्विशतक हुकलं : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी, ब्लंडेलनं आपला धावांचा वेग कायम ठेवला आणि डीन फॉक्सक्रॉफ्टसोबत मिळून संघाची धावसंख्या 460 च्या पुढं नेली. ब्लंडेल आणि फॉक्सक्रॉफ्टनं सहाव्या विकेटसाठी 158 धावांची आणखी एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळणारा ब्लंडेल अखेरीस 292 चेंडूंमध्ये 186 धावांवर रुबेन विल्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
2024 नंतरचं पहिलं शतक : या शानदार खेळीत ब्लंडेलनं 22 चौकार आणि तीन उत्तुंग षटकार ठोकले. डिसेंबर 2024 नंतरचं हे त्याचं पहिलं कसोटी शतक आणि एकूण सहावं शतक होतं. या 35 वर्षीय फलंदाजानं आतापर्यंत 45 कसोटी सामन्यांमध्ये 35.74 च्या सरासरीनं 2,359 धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याची मायदेशातील (25 सामन्यांमध्ये 1204 धावा) आणि परदेशातील (20 सामन्यांमध्ये 1155 धावा) सरासरी जवळपास सारखीच आहे (35.74 आणि 35.41).
Complete control for New Zealand on Day 2 as they enforced the follow-on against Ireland 💪
— ICC (@ICC) May 28, 2026
📝: https://t.co/ZXKloZSqFB | 📸: @BLACKCAPS pic.twitter.com/3FsTDq4fwz
सामन्यावर न्यूझीलंडची पकड मजबूत : सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास प्रथम फलंदाजी करताना कीवी संघानं रचिन रविंद्र (121), टॉम ब्लंडेल (186) आणि डीन फॉक्सक्रफ्ट (98) यांच्या खेळीच्या बळावर पहिला डाव 8 बाद 490 धावांवर घोषित केली. प्रत्युत्तरात आर्यलँड संघ पहिल्या डावात 179 धावांवर सर्वबाद झाला. संघाकडून मॅकब्राईननं 73 तर नार्क आदियरनं 40 धावांची खेळी केली, मात्र संघाला फॉलोऑनपासून वाचवू शकले नाहीत. कीवींकडून गोलंदाजीत नाथन स्मिथनं 6 बळी घेत आर्यलँडची फलंदाजी उद्धवस्त केली. यानंतर फॉलोऑनमध्ये फलंदाजी करताना आयरिश संघानं 65/2 धावा केल्या असून संघ अद्यापही 246 धावांनी पिछाडीवर आहे.
हेही वाचा :

