जो रुट म्हणजे रेकॉर्डचं दुसरं नाव! 24 धावांच्या खेळीत केला विश्वविक्रम; पाँटिंग-सचिनसह सर्वच मागे
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटनं लॉर्ड्सवर पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अंतिम सत्रात 24 धावांची खेळी करुन मोठा विश्वविक्रम मोडला.

Published : August 29, 2026 at 12:47 PM IST
लंडन Joe Root : इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटनं लॉर्ड्सवर पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अंतिम सत्रात 24 धावांची खेळी करुन मोठा विश्वविक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम मोडत राहणारा रुट आता कसोटी इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. रुटनं आता त्याला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं आहे.
रुटच्या मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये 7594 धावा : लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेव्हा जो रुट फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याला रिकी पाँटिंगला मागे टाकण्यासाठी केवळ नऊ धावांची गरज होती, आणि हा पराक्रम त्यानं सहज साधत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. जो रुटची आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे, जिथं त्याची फलंदाजी मायदेशात प्रभावी ठरली आहे. रुटनं इंग्लंडमध्ये 89 सामन्यांतील 156 डावांमध्ये 53.85 च्या सरासरीनं 7594 धावा केल्या आहेत, ज्यात 24 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगनं ऑस्ट्रेलियात 92 कसोटी सामन्यांतील 154 डावांमध्ये 7578 धावा केल्या आहेत.
Most test runs:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 28, 2026
Sachin Tendulkar - 15,921 (329 innings).
Joe Root - 14,208* (307 innings). pic.twitter.com/OTlKVQ5HbI
घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -
- जो रुट (इंग्लंड) - 7594 धावा
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 7578 धावा
- सचिन तेंडुलकर (भारत) - 7216 धावा
- महेला जयवर्धने (श्रीलंका) - 7167 धावा
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 7035 धावा
रुटसमोर आता सचिनचा जागतिक विक्रम : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत जो रुट सध्या भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्याही नावावर 68 अर्धशतकं आहेत. जर रुटनं 9 सप्टेंबरपासून एडजबॅस्टन स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं, तर तो हा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.
हेही वाचा :

