दोन देशांत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना; ऐतिहासिक मॅच कुठं पाहायची लाईव्ह?
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथं दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Published : May 27, 2026 at 12:28 PM IST
बेलफास्ट IRE vs NZ Test : न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथं दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील हा कसोटी सामना बुधवार, 27 मे रोजी सुरु होईल. हा एक ऐतिहासिक सामना असेल, कारण या दोन संघांमध्ये यापूर्वी कधीही कसोटी सामना खेळला गेलेला नाही. परिणामी, हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. जगभरातील क्रिकेट चाहते याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.
𝑾𝒉𝒆𝒓𝒆 𝒄𝒂𝒏 𝒚𝒐𝒖 𝒘𝒂𝒕𝒄𝒉?
— Cricket Ireland (@cricketireland) May 26, 2026
▪️ TNT Sports (UK & ROI)
▪️Sky NZ (New Zealand)
Also:
▪️Fancode (India)
▪️Supersport (Sub-saharan africa)
▪️Tapmad (Pakistan)
▪️Willow/Cricbuzz (North America, South East Asia, Middle East, North Africa and Continental Europe)
In addition,… pic.twitter.com/x1kkhhtmNv
सामना किती वाजता सुरु होईल? : आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना बुधवार, 27 मे रोजी बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला जाईल. हा पाच दिवसांचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल आणि रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संपेल.
Tomorrow! ☘️🇳🇿
— Cricket Ireland (@cricketireland) May 26, 2026
#BackingGreen | #IREvNZ | #FailteSolar pic.twitter.com/bAZ8lUwSEN
सामना कधी आणि कुठं पाहायचा? : आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर उपलब्ध होणार नाही. मात्र, भारतीय क्रिकेट चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटद्वारे या कसोटी सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा (लाइव्ह स्ट्रीमिंग) आनंद घेऊ शकतात. या कसोटी सामन्यात टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांसारख्या न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. दरम्यान, लॉर्कन टकर, हॅरी टेक्टर आणि कर्टिस कॅम्फर यांसारखे आयर्लंडचे स्टार खेळाडू या सामन्यात आपली छाप सोडू शकतात.
Captains ready! 👊#BackingGreen | #IREvNZ | #FáilteSolar pic.twitter.com/PvZoUGSzQG
— Cricket Ireland (@cricketireland) May 26, 2026
खेळपट्टी कशी असेल : आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळवला जाईल. या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. खेळपट्टीचा विचार करता, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे 210 धावा राहिली आहे.
Last training in Belfast! ☘️
— Cricket Ireland (@cricketireland) May 26, 2026
🎟️ NZ Test starts tomorrow: https://t.co/jMuYltsQZS#BackingGreen | #IREvNZ | #FáilteSolar pic.twitter.com/saevdmBZVZ
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
- आयर्लंड : अँड्र्यू बाल्बिर्नी (कर्णधार), जेक इगन, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), केड कारमायकल, हॅरी टेक्टर, स्टीफन डोहेनी, कर्टिस कॅम्फर, अँडी मॅकब्राइन, मार्क अडेअर, क्रेग यंग, मॅथ्यू हम्फ्रीज.
- न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, ब्लेअर टिकनर, काईल जेमिसन, विल्यम ओ'रूर्क, मॅट हेन्री/मायकल रे.
हेही वाचा :
- भारतीय तिरंदाजीचे प्रणेते श्याम लाल मीना यांचं निधन; देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक तिरंदाजी संघाचे होते सदस्य
- Norway Chess: मराठमोळ्या दिव्याची विजयी 'चाल', आर्मागेडॉनमध्ये हम्पीचा पराभव; गुकेश-प्रज्ञानंदाची मात्र निराशा
- Singapore Open: पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात; सात्विक-चिराग जोडीलाही पहिल्या फेरीत यश

