2008 ते 2026 आतापर्यंत कोणत्या संघानं जिंकलं IPL; वाचा यादी
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे.


Published : June 1, 2026 at 12:06 AM IST
अहमदाबाद IPL Winners List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे. दरवर्षी एक नवीन संघ विजेता म्हणून उदयास येतो, तर काही संघांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी आणि शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 5 विकेटनं विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
𝘾.𝙃.𝘼.𝙈.𝙋.𝙄.𝙊.𝙉.𝙎 🏆🏆@RCBTweets have done it again ❤️#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/ww2zB98Xb8
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
आरसीबीचा सहज विजय : आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीनं गुजरातला 5 गडी राखून पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर विजेतेपद राखणारा आरसीबी हा तिसरा संघ ठरला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, गुजरात टायटन्सनं 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीनं 18 षटकांत 161 धावा करून 5 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहली आरसीबीसाठी सर्वात मोठा सामनावीर ठरला.
खेळाडूंसाठी पर्वणी : ही अशी स्पर्धा आहे ज्यानं त्या खेळाडूंना रातोरात चमकवलं ज्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. इतकंच नाही तर या स्पर्धेत अशा अज्ञात खेळाडूंनाही परत आणलं ज्यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं असेल किंवा ज्यांची कारकीर्द ठप्प झाली असेल. त्यांना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली.

कोणत्या संघानं खेळल्या सर्वाधिक वेळा फायनल : स्पर्धेच्या इतिहासत चेन्नई सुपर किंग्जनं सर्वाधिक वेळा (10) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्सनं सहा वेळा आणि केकेआरनं 4 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 10 पैकी पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि पाच वेळा उपविजेतेपद मिळवलं आहे.
मुंबईनं जिंकल्या 6 पैकी 5 फायनल : तर मुंबईनं सहा पैकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय चार वेळा फायनल खेळलेल्या केकेआर संघानं 3 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबी संघानंही 4 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकदा विजेतेपद (2025) जिंकलेलं आहे.
गुजरातही राहिला विजेता : दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनीही प्रत्येकी एकदा अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात आरआरनं विजेतेपद जिंकलं होतं, तर पंजाब-दिल्ली संघांना एकही विजेतेपद जिंकता आलं नव्हतं. गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यांनी तिनदा आयपीएल फायनल खेळली आहे.
हेही वाचा :

