भारतीय संगीत क्षेत्रातील 'आशे'चा किरण मावळला; MI vs RCB सामन्यापूर्वी खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
रविवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यापूर्वी मुंबई आणि आरसीबीच्या खेळाडूंनी दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. दोन्ही संघांनी हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधली होती.

Published : April 12, 2026 at 8:10 PM IST
मुंबई Tribute to Singer Asha Bhosle : आयपीएल 2026 चा 20वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात महान भारतीय गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती. तसंच सामना सुरु होण्यापूर्वी एक मिनिटाचं मौनही पाळण्यात आलं, त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू खेळण्यासाठी मैदानात उतरले.
A moment of silence at Wankhede as we remember and pay tribute to the legendary Asha Bhosle Tai.
— Mumbai Indians (@mipaltan) April 12, 2026
Our players are wearing black armbands as a mark of respect. pic.twitter.com/YyHUYd8EY5
आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन : सुर समाज्ञी आशा भोसले यांचं रविवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. श्वास घेण्यास त्रास, छातीचा संसर्ग आणि थकवा यामुळं त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व होत्या आणि त्यांनी आपल्या आठ दशकांच्या कारकिर्दीत 20 हून अधिक भाषांत असंख्य अविस्मरणीय गाणी दिली.
विराटनं इंस्टाग्रामवर केला शोक व्यक्त : या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या विराट कोहलीनंही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिनं तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं, "आशा भोसलेजी, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुमच्या आवाजानं लाखो लोकांची मनं जिंकली आहेत आणि त्या आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील. ओम शांती."
A deeply sad day for India, and for music lovers across the world.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 12, 2026
For us, Asha Tai was family. Today, words feel too small for the loss we feel. One moment the heart falls silent, and the next, it drifts through the countless melodies she gifted all of us.
It feels as…
सचिनची भावनिक पोस्ट : आशा भोसलेंच्या निधनानंतर सचिननं लिहिलं, "भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आपण अनुभवत असलेल्या या दुःखासाठी शब्दही अपुरे वाटत आहेत. एका क्षणी मन अगदी शांत होतं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्याला दिलेल्या असंख्य सुरेल गाण्यांच्या आठवणींत ते हरवून जातं. जणू काळही काही क्षणांसाठी थांबून गेला आहे, असं वाटतं. पण त्यांच्या अमर गीतांमधून त्या कायम आपल्या सोबत राहतील." सचिन अखेरीस आशाताईंचे आभार मानत म्हणाला, "धन्यवाद ताई, आममचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीतानं भरुन टाकल्याबद्दल. आशा ताई, तुमची खूप आठवण येईल."
मुंबईनं जिंकला टॉस : या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईनं आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. तर गतविजेत्या आरसीबीनं आपल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रेयान रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट, मयंक मारकंडे, जसप्रीत बुमराह.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेविड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा.
हेही वाचा :

