'ऑरेंज आर्मी' विजयी परंपरा कायम राखणार? 2023 पासून राजस्थानची विजयाची पाटी कोरी
आयपीएल 2026 चा एलिमिनेटर सामना आज खेळला जाईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी होईल.

Published : May 27, 2026 at 9:34 AM IST
मुल्लानपूर SRH vs RR Eliminator : आयपीएल 2026 चा एलिमिनेटर सामना आज खेळला जाईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
𝐍𝐎 𝐒𝐄𝐂𝐎𝐍𝐃 𝐂𝐇𝐀𝐍𝐂𝐄𝐒 😮💨#SRH & #RR are ready for a do-or-die battle to move a step closer to the Final! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) May 27, 2026
Which team will make it to Qualifier 2? 🤔#TATAIPL 2026, Eliminator 👉 #SRHvRR | WED, 27th MAY, 6:30 PM pic.twitter.com/XO9yTZo5ve
हैदराबाद विरुद्ध राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड कसा : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादनं 14 सामने जिंकले आहेत, तर राजस्थाननं नऊ सामने जिंकले आहेत. हैदराबादनं या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानला पराभूत केलं आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबादनं 5-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळं राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना कठीण झाला आहे. राजस्थाननं हैदराबादला शेवटच्या वेळी 2023 च्या हंगामात पराभूत केलं होतं.
There are no second chances in this high-stakes clash! ⚔️
— Star Sports (@StarSportsIndia) May 27, 2026
Will #SRH make it a hat-trick of wins, or will #RR pull off the ultimate redemption? 🤔#TATAIPL 2026, Eliminator 👉 #SRHvRR | WED, 27th MAY, 6:30 PM pic.twitter.com/7yb0GSQ3pW
प्लेऑफमध्ये दोनदा आमनेसामने : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल प्लेऑफमध्येही सामना झाला आहे. 2024 हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला. यात सनरायझर्स हैदराबादनं विजय मिळवला होता. त्यापूर्वी, 2013 मध्ये हे दोन संघ एका एलिमिनेटर सामन्यातही खेळले होते. त्या सामन्यात राजस्थाननं हैदराबादला 4 गडी राखून पराभूत केलं होतं.
या हंगामातील राजस्थान आणि हैदराबादची कामगिरी : राजस्थान रॉयल्सनं आयपीएल 2026 ची सुरुवात जोरदार केली आणि आपले पहिले चार सामने जिंकले. त्यानंतर, त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. 5 व्या ते 12व्या सामन्यांदरम्यान संघाला केवळ दोन विजय मिळवता आले. मात्र, शेवटचे दोन सामने जिंकून त्यांनी प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये तीन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर, राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी सलग 5 विजयांची मालिका सुरु केली. तेव्हापासून, संघानं 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत.
𝙎𝙝𝙖𝙧𝙢𝙖 𝙭 𝙎𝙤𝙤𝙧𝙮𝙖𝙫𝙖𝙣𝙨𝙝𝙞 = 6️⃣ 𝙁𝙚𝙨𝙩! 💥🔥
— Star Sports (@StarSportsIndia) May 27, 2026
Who are you backing to hit more sixes in this do-or-die Eliminator clash? 👀🏏#TATAIPL 2026, Eliminator 👉 #SRHvRR | WED, 27th MAY, 6:30 PM pic.twitter.com/hXBPvFnuoe
सामन्यासाठी दोन्ही संघ :
सनरायझर्स हैदराबाद : ईशान किशन (कर्णधार), ट्रॅविस हेड, अनिकेत वर्मा, आर स्मरण, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, हर्षल पटेल, कामिंडु मेंडिस, ब्रायडन कार्स, जॅक एडवर्ड्स, हर्ष दुबे, पॅट कमिंस, जयदेव उनाडकट, शिवम मावी, जीशान अंसारी, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, लुआन ड्रे प्रिटोरियस, रवि सिंह, अमन पेराला, शिमरोन हेटमायेर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, एडम मिल्ने, बृजेश शर्मा, जोफ्रा आर्चर, कुलदीप सेन, क्वेना मफाका, नांद्रे बर्गर, रवि बिश्नोई आणि संदीप शर्मा.
हेही वाचा :

