ETV Bharat / sports

Live सामन्यात भारतात बॅन असलेलं ई-सिगारेट ओढताना दिसला रियान पराग? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ, BCCI मोठी कारवाई करणार?

आयपीएल 2026 च्या एका हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान, एका दृश्यानं क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला.

Riyan Parag
भारतात बॅन असलेलं ई-सिगारेट ओढताना दिसला रियान पराग? (Screenshot From Video)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 29, 2026 at 9:42 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

न्यू चंदीगढ Riyan Parag : आयपीएल 2026 च्या एका हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान, एका दृश्यानं क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. ही धक्कादायक घटना 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 40 व्या सामन्यादरम्यान घडली. राजस्थानच्या डावाच्या 16व्या षटकादरम्यान, पराग ड्रेसिंग रुममध्ये त्याचे सहकारी ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत बसून आरामात ई-सिगारेट ओढताना दिसला.

भारतात ई-सिगारेटवर बंदी : विशेष म्हणजे स्टेडियम आणि ड्रेसिंग रुममध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. मात्र परागच्या हातात ई-सिगारेट किंवा व्हेप असण्याच्या कथित घटनेमुळं आणखी गंभीर प्रश्न निर्माण होतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा (PECA), 2019 अंतर्गत भारतात ई-सिगारेट/व्हेप्सचं उत्पादन, विक्री, खरेदी, आयात, निर्यात आणि जाहिरात यावर पूर्णपणे बंदी आहे. या कायद्याचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

यापूर्वीही राजस्थान साहडलं होतं वादात : देशात ई-सिगारेट कायदेशीरही नाही आणि त्यांचं नियमनही होत नाही, त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होऊ शकते. या हंगामात राजस्थान रॉयल्स वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, टीम मॅनेजर रोमी भिंदर डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना पकडले गेले होते, जे PMOA नियमांचं उल्लंघन होतं. याप्रकरणी चौकशीनंतर, बीसीसीआयनं त्यांना ताकीद दिली आणि दंडही ठोठावला. अशात आता या नवीन वादात काय कारवाई केली जाते आणि बीसीसीआय या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

रियान परागला काय शिक्षा होऊ शकते? : आयपीएल आचारसंहितेमध्ये 'व्हेपिंग' या शब्दाचा थेट उल्लेख नसला तरी, भारतात ई-सिगारेट पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. 2019 च्या भारतीय सरकारी कायद्यानुसार (PECA) ई-सिगारेट आणि व्हेपिंगवर कठोरपणे बंदी आहे. त्यांचा वापर करणं हा कायदेशीर गुन्हा असल्यानं, स्टेडियममध्ये असं करणं ही एक गंभीर बाब मानली जाते. शिवाय, स्टेडियमच्या सुरक्षा नियमांनुसार, आयपीएलची सर्व ठिकाणं 'धूम्रपान-मुक्त' क्षेत्रं आहेत. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची प्रवेशद्वारांवर तपासणी केली जाते आणि त्यांना लायटर, काड्यापेटी किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक धूम्रपान उपकरण सोबत बाळगण्याची परवानगी नसते. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 नुसार, हे नियम मोडणं खेळासाठी अपमानास्पद मानलं जातं. यासाठी, सामनाधिकारी खेळाडूला फटकारु शकतात, त्याचं सामना शुल्क कापू शकतात किंवा निलंबनाची कारवाई देखील करु शकतात.

राजस्थानचा पंजाबवर विजय : हे उल्लेखनीय आहे की, रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स या हंगामात पंजाब किंग्सला पराभूत करणारा पहिला संघ ठरला. एका मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात राजस्थाननं पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं 20 षटकांत 4 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थाननं 19.2 षटकांत 223 धावांचं लक्ष्य पूर्ण करुन या हंगामातील आपला सहावा विजय नोंदवला. या विजयामुळं राजस्थान गुणतालिकेत एका स्थानानं पुढं जात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा :

  1. RCB चा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय; 81 चेंडू शिल्लक ठेवत उडवला दिल्लीचा धुव्वा
  2. Obstructing The Field म्हणजे काय? ज्यामुळं कोलकाताचा फलंदाज झाला आउट अन् सुरु झाला वाद
  3. 'प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो,' प्रसिद्ध स्टारनं 11 वर्षांनंतर WWE सोडताना व्यक्त केल्या भावना; सोशल मीडियावर केली पोस्ट