आरसीबी चाहत्यांच्या जल्लोषावर बंदी! आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी बंगळुरु पोलिसांचा मोठा निर्णय
आयपीएल 2026 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल.

Published : May 30, 2026 at 5:04 PM IST
बंगळुरु IPL 2026 : आयपीएल 2026 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. हे दोन संघ 31 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. आरसीबीकडे सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते अनेक वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत होते आणि आयपीएल 2025 मध्ये त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. ट्रॉफी जिंकून आरसीबीला आपल्या चाहत्यांना दुहेरी भेट देण्याची संधी आहे. मात्र, बंगळुरुच्या चाहत्यांना हा विजय साजरा करता येणार नाही.
BENGALURU: Public celebrations on roads after the match are prohibited. No LED screens facing roads or public screenings outside malls, pubs and other venues without permission. Crackers, bike rallies, stunts, overspeeding, honking, road blockages, public drinking and social… pic.twitter.com/Ir1BsobheA
— RCB Xtra (@Rcb_Xtra) May 30, 2026
बंगळुरुमध्ये पोलिसांची जल्लोषावर बंदी : आरसीबीच्या आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी बंगळुरु पोलिसांनी एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या वर्षी, पहिल्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीनं बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर उत्सवाचं आयोजन केलं होतं. स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. नंतर हे आरसीबीची चूक आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं घडलं असल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांचं आवाहन : यावर्षी बंगळुरु पोलीस कोणतीही जोखीम पत्करणार नाहीत. या कारणास्तव, त्यांनी नागरिकांना शिस्त आणि शांतता राखण्याचं आवाहन करणारी सूचना जारी केली आहे. बंगळुरु पोलिसांनी सांगितलं की, अनुचित घटना, वाहतूक कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेतील अडथळा टाळण्यासाठी ते उत्सवांवर बंदी घालत आहेत. या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा न करण्याचा निर्देश जारी करण्यात आला आहे.
🚨 Bengaluru City Police Advisory for #IPL2026 Final (May 31):
— ELECTRONICCITY PS (@elecityps) May 30, 2026
With RCB reaching the finals, the police have issued strict guidelines to maintain law & order:
❌ No public celebrations or road blockages after the match
❌ No bike rallies, and stunts @DCP_ECITY @CityAcp pic.twitter.com/B7ooULBaN8
बाईक रॅली आणि फटाक्यांवर बंदी : सामना पाहण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनच्या वापरावरही पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यांनी मॉल्स, पब्स आणि इतर ठिकाणी लोकांसाठी थेट प्रक्षेपण आयोजित न करण्याचे आवाहन केलं आहे. फटाके आणि बाईक रॅलींवरही बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास आणि भांडण केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
हेही वाचा :

