गुजरातच्या 'प्रसिद्ध' गोलंदाजीनंतर गिल-बटलरची शानदार खेळी; लखनऊच्या 'नवाबां'चा एकतर्फा पराभव
आयपीएल 2026 च्या 19व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून सहज पराभव केला.

Published : April 12, 2026 at 7:49 PM IST
लखनऊ GT Beat LSG by 7 wickets : आयपीएल 2026 च्या 19व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून सहज पराभव केला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एलएसजीनं 8 गडी गमावून 164 धावा केल्या. गुजरातनं 8 चेंडू शिल्लक असताना सहजपणे लक्ष्य गाठलं. पहिले दोन सामने गमावल्यानंतर गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे. लखनऊ सुपर जायंट्सची विजयाची हॅटट्रिक हुकली. यासह 4 सामन्यांनंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत.
Captain Gill & Jos the Boss lead from the front as GT bags 2 points 💪#GujaratTitans make it look easy, as they cruise past #LucknowSuperGiants with a 7-wicket win!#IPLRivalryWeek 2026 👉 #MIvRCB | LIVE NOW 👉https://t.co/gLbf9ggQbu | #TATAIPL pic.twitter.com/DQa6F2gGFd
— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2026
लखनऊ सुपर जायंट्सनं गमावल्या एकापाठोपाठ एक विकेट : प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी 1.3 षटकांत केवळ 14 धावांची भागीदारी केली. मार्श 4 चेंडूंमध्ये 11 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मार्करमनं कर्णधार ऋषभ पंतसोबत दुसऱ्या विकेटसाठी 16 चेंडूंमध्ये 31 धावा जोडून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पंतनं संघाच्या खात्यात 18 धावांचं योगदान दिलं. संघानं 45 धावांवर दोन गडी गमावले होते, त्यानंतर मार्करमनं आयुष बडोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 17 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. मार्करम 6 चौकारांसह 21 चेंडूंमध्ये 30 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला, तर आयुष बडोनीनं संघाच्या खात्यात 9 धावांचं योगदान दिलं.
A clinical performance by #GT to make it 2️⃣ wins in 2️⃣ games
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
The @gujarat_titans reach 5th spot on the points table with this away win ✌️
SCORECARD ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/d0BghVD5kY
प्रसिद्ध कृष्णाची घातक गोलंदाजी : लखनऊ सुपर जायंट्सनं 74 धावांवर चार गडी गमावले होते. त्यानंतर निकोलस पूरननं अब्दुल समदच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 35 धावा जोडून संघाला शतक पूर्ण करुन दिलं. दरम्यान, पूरननं 21 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या. अब्दुल समद आणि मुकुल चौधरी प्रत्येकी 18 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. जॉर्ज लिंडेनं 16 धावांचं योगदान दिलं, तर मोहम्मद शमी 5 चेंडूंमध्ये 12 धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णानं 28 धावांत 4 बळी घेतले, तर अशोक शर्मानं २ बळी घेतले.
गुजरातकडून गिल आणि बटलरची अर्धशतकं : लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातनं सावध सुरुवात केली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी 5.1 षटकांत पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. दिग्वेश राठीनं सुदर्शनला 15 धावांवर बाद केलं. त्यानंतर शुभमन गिलसोबत जोस बटलर सामील झाला. या दोघांनी 84 धावांची भागीदारी केली. गिलनंतर बटलरनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गिल 15 व्या षटकात, तर बटलर 16 व्या षटकात बाद झाला. गिलनं 40 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या, तर बटलरनं 37 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं राहुल तेवतियासोबत मिळून 19 व्या षटकात संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. लखनऊकडून मोहम्मद शमी आणि प्रिन्स यादव यांनी दिग्वेश राठी यांच्यासह प्रत्येकी एक बळी घेतला.
हेही वाचा :

