संजू-कार्तिकची शानदार खेळी, चेन्नईचा 'सुपर' विजय; प्लेऑफच्या शर्यतीत कायम
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा 48वा सामना आज 5 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला.

Published : May 6, 2026 at 9:14 AM IST
नवी दिल्ली CSK Beat DC : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा 48वा सामना आज 5 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. यात चेन्नईनं दिल्लीचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं सीएसकेसमोर 156 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे पाहुण्या संघानं 17.3 षटकांत पूर्ण केलं. या हंगामातील चेन्नईचा हा पाचवा विजय असून, त्यांचे आता 10 गुण झाले आहेत. चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सचा हा सहावा पराभव होता. येथून 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी दिल्लीला आपले उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील.
Whistle Podu, #CSK!
— Star Sports (@StarSportsIndia) May 5, 2026
An exceptional knock by Sanju Samson helped Chennai register a thumping win in Delhi! 💛💪🔥#DCvCSK #SanjuSamson #KartikSharma #KuldeepYadav #TristanStubbs #UrvilPatel
Watch the winning moments 👉 https://t.co/hVsFUTS2OG pic.twitter.com/LqypaVedDP
संजू आणि कार्तिकची शानदार खेळी : दिल्लीविरुद्ध धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसननं पुन्हा एकदा सीएसकेसाठी शानदार कामगिरी केली. डावाची सुरुवात करताना संजूनं 52 चेंडूंमध्ये नाबाद 87 धावा केल्या. त्यानं या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकारही मारले. मागील सामन्यात सीएसकेसाठी अर्धशतक झळकावणाऱ्या कार्तिक शर्मानंही 31 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. कार्तिकनं आपल्या खेळीत दोन षटकार आणि चार चौकार मारले. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सहा आणि उर्विल पटेलनं 17 धावा करून सीएसकेला सहज विजय मिळवून दिला.
🚫🚫🚫
— Star Sports (@StarSportsIndia) May 5, 2026
Delhi were up for a revenge, but Sanju Samson had other plans! 😎#DCvCSK #SanjuSamson #KartikSharma #KuldeepYadav #TristanStubbs #UrvilPatel#TATAIPL pic.twitter.com/tPOeCygBRq
दिल्ली कॅपिटल्सची खराब फलंदाजी : सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजी सामान्य होती. पथुम निस्संका आणि केएल राहुल चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. दिल्लीचे पहिले पाच फलंदाज क्रीजवर जास्त वेळ टिकू शकले नाहीत, त्यामुळं संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. मधल्या फळीत समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी निश्चितच चांगला प्रयत्न केला. रिझवीनं चार षटकारांच्या मदतीनं 24 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या, तर स्टब्सनं 31 चेंडूंमध्ये 38 धावांचं योगदान दिलं. नूर अहमद सीएसकेसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन बळी घेतले.
A proven match-winner now emerging as CSK’s go-to man! 💪💛
— Star Sports (@StarSportsIndia) May 5, 2026
Well played, #SanjuSamson! 👏#DCvCSK #SanjuSamson #KartikSharma #KuldeepYadav #TristanStubbs #UrvilPatel#TATAIPL pic.twitter.com/fBo71Qzi1n
हेही वाचा :

