चाहत्यांसाठी खुशखबर; 'व्हॅलेंटाईन डे'पासून पुन्हा सुरु होणार 'ही' लीग; सर्व 14 क्लब होणार सहभागी
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन सुपर लीगचा नवीन हंगाम सुर होणार असल्याची माहिती क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे.

Published : January 7, 2026 at 11:55 AM IST
नवी दिल्ली ISL Starting February 14 : भारतीय फुटबॉलला मोठी चालना मिळत आहे. अशातच थांबलेली इंडियन सुपर लीग (ISL) 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा सुरु होईल. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 6 जानेवारी रोजी अधिकृतपणे याची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की सर्व 14 क्लब या लीगमध्ये सहभागी होतील. क्रीडा मंत्री मांडविया यांनी सांगितलं की आयएसएलबद्दल बरीच अटकळ होती, परंतु आज सरकार, फुटबॉल फेडरेशन, मोहन बागान आणि ईस्ट बंगालसह सर्व 14 क्लब यांच्यासोबत बैठक झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की आयएसएल 14 फेब्रुवारी रोजी सुरु होईल आणि सर्व क्लब सहभागी होतील.
VIDEO | Delhi: “Indian Super League (ISL) is to feature 91 matches on home and away basis. Governing Council Board will take commercial decisions,” says AIFF President Kalyan Chaubey on resumption of ISL for 2025-26 season from February 14.
— Press Trust of India (@PTI_News) January 6, 2026
(Full video available on PTI Videos –… pic.twitter.com/9xmhuXFsFR
आय-लीग लवकरच पुन्हा सुरु होणार : क्रीडामंत्र्यांनी असंही सांगितले की थांबलेली आय-लीग त्याच वेळी पुन्हा सुरु होईल. सर्व 11 क्लब आय-लीगमध्ये सहभागी होतील. क्रीडामंत्र्यांच्या घोषणेनंतर, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी स्पर्धेशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आयएसएलमध्ये होम अँड अवे स्वरुपात एकूण 91 सामने खेळवले जातील, तर आय-लीग 55 सामन्यांची करण्यात आली आहे.
आयएसएलसाठी 25 कोटी रुपयांचा सेंट्रल पूल : कल्याण चौबे यांनी सांगितलं की आयएसएलसाठी 25 कोटी रुपयांचा सेंट्रल पूल स्थापित करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की या निधीतील 10 टक्के निधी एआयएफएफकडून येईल. 30 टक्के व्यावसायिक भागीदाराकडून येणार होता, परंतु सध्या आमच्याकडे भागीदार नाही, त्यामुळं एआयएफएफ तो भाग देखील भरेल. त्यांनी पुढं सांगितलं की एआयएफएफ आयएसएलसाठी अंदाजे 14 कोटी रुपये आणि व्यावसायिक भागीदार सापडेपर्यंत आय-लीगसाठी अंदाजे 3.2 कोटी रुपये योगदान देईल. आयएसएल आणि आय-लीग पुन्हा सुरु झाल्यामुळे भारतीय फुटबॉलमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. परिणामी खेळाडू आणि चाहते पुन्हा एकदा मैदानावर रोमांचक सामने पाहतील.
हेही वाचा :

