कांगारुंच्या भूमीवर भारतीय संघाचा जलवा, 10 वर्षांनंतर मालिका जिंकत लिहिला नवा इतिहास; स्मृती-जेमिमा चमकल्या
भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला.

Published : February 21, 2026 at 5:05 PM IST
अॅडलेड INDW vs AUSW T20I : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियानं 17 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. भारतीय महिला संघानं 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीवर द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. निर्णायक सामन्यात टीम इंडियानं स्मृती-जेमिमाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारुंचा डाव 20 षटकांत 9 बाद 159 धावांपर्यंत मर्यादित राहिला. 82 धावांची खेळी करणाऱ्या स्मृती मंधानाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
Clinical India seal the first T20I series victory against Australia in ten years with a win in Adelaide 👏
— ICC (@ICC) February 21, 2026
📝: https://t.co/ELNERKQXxt pic.twitter.com/XEFSJHDQQk
स्मृती-जेमिमाची अर्धशतकी खेळी : या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर संघानं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात स्मृती मंधानानं 55 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावांची शानदार खेळी केली, तर जेमिमा रॉड्रिग्जनं 46 चेंडूत 59 धावा केल्या. याशिवाय, ऋचा घोषनंही 18 धावांची खेळी केली. ज्यामुळं संघाला आव्हानात्मक मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून गोलंदाजीत, अॅनाबेल सदरलँडनं 2 तर सोफी मोलिनेक्स आणि किम गार्थनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
Smiles all-around in Adelaide 🥳#TeamIndia register a commanding win by 1⃣7⃣ runs ✌️
— BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2026
With that, they clinch the #AUSvIND T20I series 2⃣-1⃣ 🏆
Scorecard ▶️ https://t.co/8PDW83zavH pic.twitter.com/CTN9QjU0Vx
कांगारुंची फलंदाजी अपयशी : भारतानं दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच षटकाच जॉर्जिया व्हॉलच्या (10) रुपात 19 धावांवर पहिला धक्का बसला. यानंतर बेथ मुनीही (6) स्वस्तात बाद झाली. यानंतर आलेली एलिस पेरीही काही खास करु शकली नाही, ती फक्त 1 धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर ठराविक अंतरानं संघाच्या विकेट पडत राहिल्या. मात्र एका बाजूनं अॅशले गार्डनरनं 45 चेंडूत 57 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला यश मिळालं नाही. तिच्या व्यतिरिक्त फोबे लिचफिल्ड (26) आणि जॉर्जिया वेहराम (12) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. परिणामी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारु संघ 20 षटकांत 9 बाद 159 धावाच करु शकला. टीम इंडियाकडून श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अरुंधती रेड्डी यांनी दोन आणि रेणुका सिंग ठाकूर यांनी एक विकेट घेतली.
हेही वाचा :

