Hockey World Cup: 1974 नंतर सर्वोत्तम कामगिरी करण्याची भारतीय संघाला संधी; जर्मनीविरुद्ध विजय मिळताच घडणार इतिहास
भारतीय महिला हॉकी संघ गुरुवारी एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 च्या 5व्या-6व्या स्थानासाठीच्या सामन्यात जर्मनीचा सामना करेल.

Published : August 27, 2026 at 10:12 AM IST
मुंबई Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघ गुरुवारी एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 च्या 5व्या-6व्या स्थानासाठीच्या सामन्यात जर्मनीचा सामना करेल. हा सामना जिंकून विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचं संघाचं ध्येय असेल. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नवव्यांदा विश्वचषकात खेळताना, भारतीय संघाला पाच सामन्यांमध्ये फक्त एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जर्मनीविरुद्धचा विजय भारताला 1974 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात चौथं स्थान पटकावल्यानंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याची संधी प्राप्त होईल.
Captain Salima Tete and Neha look back on a memorable campaign for the Indian Women’s Team at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026, while also looking ahead to their upcoming 5th/6th place match against Germany. 🏑🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) August 26, 2026
Hear from the duo as they reflect on the… pic.twitter.com/gij1JilsuV
चीन, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दिली कडवी झुंज : भारतीय संघानं संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त झुंजार वृत्ती दाखवली. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन, तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना बरोबरीत रोखलं. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा दणदणीत विजय नोंदवला, जो विश्वचषकातील त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघानं गतविजेत्या नेदरलँड्सविरुद्धही दमदार कामगिरी केली, ज्यांनी हा सामना 2-0 नं जिंकला. दुसऱ्या टप्प्यात भारत तिसऱ्या स्थानावर राहिला आणि काही अटीतटीचे सामने जिंकण्यात अपयशी ठरल्यानं उपांत्य फेरीतील स्थान गमावलं.
जर्मनीपुढील आव्हान सोपं नाही : जर्मनीनंही स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यांनी सुरुवातीच्या गट टप्प्यात स्कॉटलंड आणि अमेरिकेला पराभूत केलं, आणि दुसऱ्या टप्प्यात स्पेनविरुद्ध विजय मिळवला. मात्र, बेल्जियमकडून पराभव पत्करल्यानंतर, जर्मनी आपल्या गटात तिसऱ्या स्थानावर राहिला आणि त्यांना 5व्या-6व्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करावा लागला.
विजय मिळवल्यास घडेल नवीन इतिहास : जर्मनीविरुद्धचा विजय हा भारतीय महिला हॉकीसाठी एका अविस्मरणीय विश्वचषक मोहिमेचा परिपूर्ण शेवट ठरेल. पाचवं स्थान मिळवणं ही केवळ त्यांची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरीच ठरणार नाही, तर येत्या अनेक वर्षांसाठी महिला हॉकीमध्ये एक नवीन मापदंडही प्रस्थापित करेल.
हेही वाचा :

