सोनलची एकाच सामन्यात दोन शतकं, पाच दिवसांच्या खेळानंतरही श्रीलंकेविरुद्ध दुसरी मॅच 'ड्रॉ'; भारतानं जिंकली मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब इथं खेळवण्यात आला.

Published : August 27, 2026 at 4:38 PM IST
कोलंबो IND vs SL 2nd Test : भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघातील दुसरा कसोटी सामना रोमांचकरीत्या अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं आपला पहिला डाव 503/9 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ 290 धावांवर सर्वबाद झाला. परिणमी भारतानं 213 धावांची भक्कम आघाडी घेतली. फॉलोऑन खेळण्यास भाग पडलेल्या श्रीलंकेनं आपल्या दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन करत 429/9 धावांचा डोंगर उभा केला आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या कसोटीत भारताचं विजयाचं स्वप्न थोडक्यात हुकलं असलं तरी, भारतानं दोन सामन्यांची मालिका 1-0 नं जिंकली. या सामन्यात श्रीलंकेच्या सोनल दिनुशानं दोन्ही डावात शतक झळकावत सामना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Sri Lanka’s resilience with the bat ensures that only three wickets fall on the final day. The two teams shake hands after a hard-fought Test, which ends in a draw.#TeamIndia win the series 1-0.
— BCCI (@BCCI) August 27, 2026
Details - https://t.co/Uh4Xgn8rB5 pic.twitter.com/spxoqmBzct
पहिल्या डावातील आघाडीनंतर भारतानं दिलं फॉलो-ऑन : या सामन्यात, भारतानं पहिल्या डावात 9 गडी गमावून 503 धावा केल्यानंतर, श्रीलंकेला त्यांच्या पहिल्या डावात 290 धावांवर सर्वबाद करुन फॉलो-ऑन देण्यास भाग पाडले. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी उल्लेखनीय जिद्द दाखवत पुढच्या डावात 9 गडी गमावून 429 धावा केल्या आणि अखेरीस सामना अनिर्णित राखण्यास भाग पाडलं.
सोनल दिनुशाची शानदार खेळी : सोनल दिनुशा आणि केशरा नुवान्थानं पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजीला निष्प्रभ करत श्रीलंकेला सामन्यात टिकवून ठेवलं. दिनुशा आणि नुवान्थानं 7व्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. या दोघांनी 242 चेंडूंचा सामना केला. परिणामी, श्रीलंकेला लवकर बाद करण्याचे भारताचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले. सोनलनं पहिल्या सत्रात आपलं तिसरं कसोटी अर्धशतकही पूर्ण केलं.
Sonal Dinusha shines as Sri Lanka stand firm to earn an epic draw against India 💪#WTC27 | 📝: https://t.co/8NP3Qr1pnQ pic.twitter.com/mP4oRs6fIK
— ICC (@ICC) August 27, 2026
मानव सुथारनं करवून दिलं पुनरागमन : शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळाली. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारनं केशरा नुवान्थाला बाद केलं. त्यानं 46 धावा केल्या आणि 150 चेंडूंचा सामना केला. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या प्रभात जयसूर्यानं 28 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या. त्याची विकेट रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पडली. सोनल आणि जयसूर्याची भागीदारी 71 चेंडूंपर्यंत टिकली आणि त्यात 25 धावा जोडल्या गेल्या.
दिनुशानं दुसऱ्या डावातही झळकावलं शतक : संपूर्ण मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या सोनल दिनुशानं तिसऱ्या आणि अंतिम सत्रातही आपली लय कायम ठेवत सामन्यातील आपलं दुसरं शतक झळकावलं. श्रीलंकेच्या आठ विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या लाहिरु कुमारानं त्याला उत्तम साथ दिली. कुमारानं 90 चेंडू खेळून 12 धावा केल्या आणि भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा संपुष्टात आणल्या. नंतर, डावातील शेवटचा फलंदाज असिथा फर्नांडो 24 चेंडूंमध्ये नाबाद राहिला, तर सोनल दिनुशा 133 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात भारतासाठी रवींद्र जडेजा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
A remarkable run continues 👏
— ICC (@ICC) August 27, 2026
Sonal Dinusha brings up his third Test century in four innings 💯#WTC27 | 📝: https://t.co/8NP3Qr1pnQ pic.twitter.com/AnEzEPxQGp
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत नुकसान : हा सामना अनिर्णित राहिल्यानं भारताच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. जर टीम इंडियानं हा सामना जिंकला असता, तर त्यांना 12 गुण मिळाले असते आणि त्यांची गुणांची टक्केवारी 63.33 पर्यंत वाढली असती, ज्यामुळं ते आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले असते. मात्र, सामना अनिर्णित राहिल्यानं भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुणांवर समाधान मानावं लागलं. या निकालामुळं भारताची गुणांची टक्केवारी 53.33 वरुन 51.51 पर्यंत घसरली आहे, तरीही संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा पीसीटी 33.33 असून, डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या नऊ संघांमध्ये तो सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा :

