T20 विश्वचषकापूर्वी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; 'फ्री'मध्ये कुठं पाहायची निर्णायक मॅच?
इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज, 30 मे रोजी खेळला जाईल.

Published : May 30, 2026 at 3:04 PM IST
ब्रिस्टल INDW vs ENGW 2nd T20I : इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज, 30 मे रोजी खेळला जाईल. हा सामना ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:00 वाजता सुरु होईल. भारतीय संघ हा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेवरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंड महिला संघावर मालिकेत टिकून राहण्याचा दबाव असेल.
🔙 to 🔙 T20I series victories in England in sight! 😎🏆
— BCCI Women (@BCCIWomen) May 30, 2026
A challenge in Bristol up next! ⏭️#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/k8gYxx9P2x
पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा विजय : भारतीय महिला संघानं पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 38 धावांनी पराभूत करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स आणि यास्तिका भाटिया यांनी शानदार अर्धशतकं झळकावली, तर पदार्पण करणाऱ्या नंदिनी शर्मानं तीन बळी घेतले. भारतीय संघ आता सलग दुसरा विजय मिळवून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंड महिला संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. या मालिकेत हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे, तर शार्लट डीन इंग्लंड महिला संघाचं नेतृत्व करेल.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड काय : महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 36 सामने खेळले गेले आहेत. या काळात इंग्लंड महिला संघाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यांनी 24 सामने जिंकले आहेत, तर भारतीय महिला संघानं 12 सामन्यांमध्ये यश मिळवलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील एकही सामना अनिर्णित राहिलेला नाही. पहिल्या सामन्यातील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय महिला संघ आत्मविश्वासानं भारलेला आहे.
Chelmsford 🚎 Bristol #TeamIndia have arrived for the 2⃣nd #ENGvIND T20I 🙌 pic.twitter.com/qLolRJgFtx
— BCCI Women (@BCCIWomen) May 29, 2026
मैदानाची खेळपट्टी कशी असेल : ब्रिस्टल येथील मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. खेळपट्टी सपाट राहण्याची शक्यता असून, टी-20 क्रिकेटमध्ये इथं अनेकदा मोठ्या धावा होतात. नवीन चेंडूमुळं वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळू शकतो, परंतु सामना जसजसा पुढं जाईल तसतशी फलंदाजी सोपी होईल. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 164 ते 175 धावांच्या दरम्यान असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता खूपच कमी असल्यानं चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा आनंद घेता येईल.
सामना कुठं पाहता येणार : इंग्लंड आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज, 30 मे रोजी, ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. भारतात, या सामन्याचं थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. तर सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
हेही वाचा :

