ETV Bharat / sports

भारतीय संघ करणार बांगलादेशचा दौरा; खेळणार वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका

भारतीय क्रिकेट संघ यावर्षी वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

IND vs BAN Series
भारतीय संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 2, 2026 at 5:08 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली IND vs BAN Series : या वर्षी भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका मूळतः 2025 मध्ये होणार होती, परंतु त्यावेळी ती पुढं ढकलण्यात आली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आता याबाबत एक महत्त्वाचं विधान जारी केलं आहे. बांगलादेशनं या वर्षासाठी त्यांचं होम कॅलेंडर देखील जारी केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, यात वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळेल. मात्र, बीसीसीआयनं अद्याप याबद्दल कोणतंही अधिकृत विधान जारी केलेलं नाही.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं कॅलेंडर : बांगलादेशनं त्यांचं 2026 चं कॅलेंडर जाहीर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, भारतीय संघ देखील तिथं दौरा करणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया बांगलादेशमध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. काही सूत्रांनी वेळापत्रक देखील उघड केले आहे, परंतु बीसीसीआयनं अद्याप ते जाहीर केलेलं नाही.

वनडे मालिका 1 सप्टेंबरपासून सुरु होणार : दरम्यान, क्रिकबझनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन्स हेड शहरयार नफीस यांच्या हवाल्यावनं सांगितलं की, मूळ 2025 मध्ये नियोजित असलेली ही मालिका पुन्हा वेळापत्रकात बदलण्यात आली आहे. अहवालात म्हटलं आहे की टीम इंडिया 28 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये पोहोचेल. पहिला वनडे सामना 1 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. मालिकेतील दुसरा वनडे सामना 3 सप्टेंबर रोजी तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 6 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिकेचं वेळापत्रक : यानंतर, तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की मालिकेतील पहिला सामना 9 सप्टेंबर रोजी, दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी आणि शेवटचा टी-20 सामना 13 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. मात्र, बांगलादेशमधील परिस्थिती सध्या संवेदनशील आहे, त्यामुळं टीम इंडिया तिथं दौरा करेल की नाही हे स्पष्ट नाही. असं मानलं जातं की बीसीसीआय मालिका सुरु होण्यापूर्वी निश्चितपणे अहवाल मागवेल. एवढंच नाही तर, बांगलादेशनं दिलेलं वेळापत्रक बीसीसीआयनं जाहीर केल्याशिवाय निश्चितपणे काहीही सांगणं योग्य ठरणार नाही.

हेही वाचा :

  1. 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ किती वेळा येतील आमनेसामने; लिहून ठेवा तारीख
  2. सामन्याच्या 48 तासांआधीच अंतिम संघ; 'या' खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी
  3. भारतात कीवींनी अनेक वर्षांपासून जिंकला नाही वनडे सामना; कसा आहे दोन्ही संघांचा विक्रम?