IND vs AFG: पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; गुरबाजची शतकी खेळी व्यर्थ
भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला आहे.


Published : June 13, 2026 at 11:20 PM IST
धर्मशाळा IND Beat AFG : भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला आहे. धर्मशाळा इथं खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात, भारतीय संघानं शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळं सामना उशिरा सुरु झाला, त्यामुळं पंचांना षटकांची संख्या प्रत्येकी 25 पर्यंत कमी करावी लागली.
India secure victory in the opening ODI to move ahead in the series against Afghanistan 💪
— ICC (@ICC) June 13, 2026
📝: https://t.co/iz4AIi7Ol4 pic.twitter.com/G9iiGZrB38
अफगाणिस्तानकडून गुरबाजचं धमाकेदार शतक : या सामन्यात, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना, सामना कमी षटकांचा होताच अफगाणिस्ताननं पूर्ण टी-20 फॉरमॅटचा अवलंब केला. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजनं आपल्या वनडे कारकिर्दीतील नववं शतक अवघ्या 48 चेंडूंमध्ये झळकावत मैदानावर धुमाकूळ घातला. मात्र, गुरबाजच्या धमाकेदार शतकानंतरही, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत अफगाणिस्तानला 24.5 षटकांत 194 धावांवर सर्वबाद केलं. यामुळं टीम इंडियासमोर 25 षटकांत 195 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात आलं.
Picture-Perfect 🙌#TeamIndia wrap a comprehensive victory by 7️⃣ wickets in Dharamshala ✅
— BCCI (@BCCI) June 13, 2026
They lead the #INDvAFG ODI series by 1️⃣-0️⃣ 👌
Scorecard ▶️ https://t.co/lCuohEZYAl @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RNy13a0PHX
कर्णधार शुभमन गिलची शानदार खेळी : 195 धावांच्या या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघानं अगदी अफगाणिस्तानप्रमाणेच आपली टी-20 फलंदाजीची शैली दाखवली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि विरोधी गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. भारताच्या या दणदणीत विजयात कर्णधार शुभमन गिलनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं संघाचं नेतृत्व करत एक शानदार खेळी केली आणि केवळ 66 चेंडूंमध्ये सामना जिंकून देणारी 84 धावांची खेळी केली. गिलच्या शानदार खेळीमुळं आणि इतर फलंदाजांच्या योगदानामुळं, टीम इंडियानं हे लक्ष्य सहजपणे पार केलं आणि 7 गडी राखून एक ऐतिहासिक विजय मिळवला.
हेही वाचा :

