टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा मोठा धमाका; पाकिस्तान आणि इंग्लंडच्या विक्रमाची बरोबरी
कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय मिळवून, भारतानं केवळ उपांत्य फेरीत प्रवेश केला नाही तर पाकिस्तान आणि इंग्लंडच्या प्रतिष्ठित विक्रमाची बरोबरीही केली आहे.

Published : March 2, 2026 at 10:58 AM IST
कोलकाता India in Semifinal : 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात टीम इंडियानं एक मोठा टप्पा गाठला आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय मिळवून, भारतानं केवळ उपांत्य फेरीत प्रवेश केला नाही तर पाकिस्तान आणि इंग्लंडच्या प्रतिष्ठित विक्रमाची बरोबरीही केली आहे.
A clinical victory and Team India are through to the semi-final of the ICC Men's #T20WorldCup 2026!
— Star Sports (@StarSportsIndia) March 1, 2026
Onwards & upwards! 🚀
ICC Men’s #T20WorldCup Semi-Final 2 👉 #INDvENG | THU, 5 MAR, 6 PM pic.twitter.com/nIGES97XJf
टीम इंडिया सहाव्यांदा उपांत्य फेरीत : टीम इंडिया आता पुरुष टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सहा वेळा उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. यापूर्वी, भारतीय संघानं 2007, 2014, 2016, 2022 आणि 2024 मध्ये अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा पराक्रम केला होता. 2026 मध्ये उपांत्य फेरी गाठून, भारतानं या प्रतिष्ठित यादीत पाकिस्तान आणि इंग्लंडची बरोबरी केली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानही प्रत्येकी सहा वेळा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
सर्वाधिक वेळा उपांत्य फेरीत पोहोचलेले संघ :
- पाकिस्तान - 6 वेळा (2007, 2009, 2010, 2012, 2021, 2022)
- भारत - 6 वेळा (2007, 2014, 2016, 2022, 2024, 2026)
- इंग्लंड - 6 वेळा (2010, 2016, 2021, 2022, 2024, 2026)
Most semifinal appearances in T20 World Cup
— CRIC INSIGHTS (@TheCricInsights) March 2, 2026
6 - India
6 - England
6 - Pakistan
5 - New Zealand pic.twitter.com/e1qgEJwITU
भारतीय संघानं नोंदवला ऐतिहासिक विजय : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 195 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. संघासाठी रोस्टन चेस आणि जेसन होल्डरने संघाला जोरदार खेळी साकारली. चेसनं 40 धावा केल्या, तर होल्डरनं नाबाद 37 धावा काढल्या. प्रत्युत्तरात, भारतानं सलामीवीर संजू सॅमसनच्या 50 चेंडूत 12 चौकार आणि चार षटकारांसह केलेल्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या बळावर 19.2 षटकांत 5 बाद 199 करत विजय मिळवला.
टी-20 विश्वचषकात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग : भारतानं 19.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठलं. अशाप्रकारे, टीम इंडियानं टी-20 विश्वचषक इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला. यापूर्वी, 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सर्वात मोठा पाठलाग 173 धावांचा पाठलाग होता. शिवाय, 196 धावांचं हे लक्ष्य स्पर्धेच्या इतिहासातील एकूण तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग आहे.
हेही वाचा :

