टीम इंडिया ठरली आशियाई चॅम्पियन; अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करत दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा
महिला आशिया कप रायझिंग स्टार 2025 चा अंतिम सामना बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर भारत अ आणि बांगलादेश अ क्रिकेट संघात झाला.

Published : February 22, 2026 at 4:51 PM IST
बँकॉक IND-A Win : महिला आशिया कप रायझिंग स्टार 2025 चा अंतिम सामना बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर भारत अ आणि बांगलादेश अ क्रिकेट संघात झाला. या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 46 धावांनी पराभव करुन आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं बांगलादेशसमोर 135 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेश अ महिला संघाला हे लक्ष्य गाठता आलं नाही, त्यांचा संघ 19.1 षटकांत 88 धावांवर सर्वबाद झाला. भारत अ महिला संघानं आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2023 मध्येही त्यांनी बांगलादेशला हरवून पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती.
𝐏𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐧𝐠 𝐭𝐨 𝐲𝐨𝐮 𝐭𝐡𝐞 #𝐃𝐏𝐖𝐨𝐫𝐥𝐝𝐖𝐨𝐦𝐞𝐧𝐬𝐀𝐬𝐢𝐚𝐂𝐮𝐩𝐑𝐢𝐬𝐢𝐧𝐠𝐒𝐭𝐚𝐫𝐬𝟐𝟎𝟐𝟔 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 🏆🇮🇳#ACC pic.twitter.com/T83kbNEchM
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 22, 2026
भारत अ संघाकडून तेजल हसबनीसचं अर्धशतक : भारत अ संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या सलामीवीर वृंदा दिनेश आणि नंदिनी कश्यप यांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. पहिली विकेट पडल्यानंतर टीम इंडियानं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. या सामन्यात टॉप-ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, परंतु त्यांना त्याचं मोठ्या डावात रुपांतर करता आलं नाही. या अंतिम सामन्यात भारताकडून एकमेव अर्धशतक तेजल हसबनीसचं होतं. तिनं 34 चेंडूत 51 धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकार मारले. कर्णधार राधा यादवनंही 30 चेंडूत 36 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त, या सामन्यात दुहेरी आकडा गाठणारी वृंदा दिनेश ही एकमेव फलंदाज होती. वृंदा हिनं 17 चेंडूत 19 धावा केल्या.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆
— BCCI Women (@BCCIWomen) February 22, 2026
The Radha Yadav-led India A team clinch the #WomensRisingStarsAsiaCup title 🇮🇳 🙌
Scorecard ▶️ https://t.co/BazaDT9PQD pic.twitter.com/aCKmZ8w5aO
बांगलादेशची निराशजनक फलंदाजी : लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली नव्हती. इश्मा तन्झिम पाच चेंडूत तीन धावा काढून बाद झाली तेव्हा संघाला पहिला धक्का फक्त 12 धावांवर बसला. या विकेटनंतर, बांगलादेशचे उर्वरित फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. बांगलादेशच्या खराब फलंदाजी कामगिरीचा अंदाज यावरुन लावता येतो की संघाचा एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही. फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बांगलादेशकडून शमीमा सुलतानानं 16 चेंडूत 20 धावा काढल्या. सरमिन सुलतानानंही 29 चेंडूत 18 धावा केल्या. तर गोलंदाजीत भारत अ संघाकडून प्रेरणा रावतनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
Clinical 👌
— BCCI Women (@BCCIWomen) February 22, 2026
A complete all-round show from India A as they register a commanding victory by 4⃣6⃣ runs in the Final of the #WomensRisingStarsAsiaCup 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/BazaDT9PQD pic.twitter.com/GNJqErWeyw
हेही वाचा :

