ETV Bharat / sports

IND vs ZIM सामना पावसामुळं रद्द होणार? चेन्नईमधून आली मोठी अपडेट

2026 च्या टी-20 विश्वचषकात, सुपर-8 फेरीत टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.

Weather Chennai
सामना पावसामुळं रद्द होणार? (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 26, 2026 at 12:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चेन्नई Weather Chennai : 2026 च्या टी-20 विश्वचषकात, सुपर-8 फेरीत टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. जर टीम इंडियाला या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत झिम्बाब्वेला हरवावं लागेल. पण या सामन्यात पावसामुळं व्यत्यय येईल का? जर पावसामुळं सामना रद्द झाला तर काय होईल? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.

पावसामुळं सामना रद्द झाला तर काय? : जर भारताला सेमीफायनलच्या शर्यतीत राहायचं असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल हे निश्चित आहे. पण जर हा सामना कोणत्याही कारणास्तव पूर्ण झाला नाही किंवा पावसामुळं रद्द झाला तर भारत जवळजवळ निश्चितच स्पर्धेतून बाहेर पडेल. कारण जर सामना खेळला गेला तर टीम इंडियाला एक गुण मिळेल. यानंतर, भारतीय संघ जास्तीत जास्त तीन गुणांपर्यंत पोहोचू शकेल. या परिस्थितीत, त्यांचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास जवळजवळ संपेल. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.

IND विरुद्ध ZIM सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? : हवामान अंदाजानुसार गुरुवारी, सामन्याच्या दिवशी चेन्नईमध्ये निरभ्र आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दिवसा ऊन असेल आणि संध्याकाळपर्यंत तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. सध्या पावसाचा अंदाज नाही. मात्र, सोमवारी हवामान अंदाजाचा आढावा घेतला असता, आधी गुरुवारी दुपारी 25 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. परंतु, सामन्याचा दिवस येईपर्यंत हा अंदाज शून्यावर आला होता.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, संजू सॅमसन
  • झिम्बाब्वे : तादिवानाशे मारुमणी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, बेन करन, क्लाइव मडांडे, टिनोटेंडा मापोसा, वेलिंगटन मसाकाद्जा.

हेही वाचा :

  1. रिंकू सिंह झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल की नाही? प्रशिक्षकांनी थेटच सांगितलं
  2. वय फक्त एक अंक! दूध विकून उदरनिर्वाह करणाऱ्या 84 वर्षीय मुन्नालाल यादव यांनी लांब उडीमध्ये जिंकले तीन 'गोल्ड मेडल'
  3. पाकिस्तानी खेळाडूंची द हंड्रेडमधून हकालपट्टी होणार? ईसीबीनं केलं मोठं विधान