IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियाची विजयी सुरुवात; श्वास रोखून ठेवणाऱ्या सामन्यात 4 विकेटनं विजय
भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना रविवारी कोटाम्बी, वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला. यात भारतानं विजय मिळवला.

Published : January 11, 2026 at 12:42 PM IST
|Updated : January 12, 2026 at 12:54 PM IST
वडोदरा IND vs NZ 1st ODI भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनड मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं चार विकेटनं विजय मिळवत नव्या वर्षाची विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकांत 8 बाद 300 धावा केल्या. अतुतरात भारतीय संघाने विराट कोहलीच्या 93 धावांच्या खेळीच्या बळावर चार विकेटनं सामना आपल्या नावावर केला. यासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
India go 1-0 up in the ODI series against New Zealand with a thrilling win in Vadodara 👊#INDvNZ 📝: https://t.co/oprL3bLZsz pic.twitter.com/RuHppPaJ4r
— ICC (@ICC) January 11, 2026
न्यूझीलंडची दमदार सुरुवात : प्रथम फलंदाजीची करण्याची संधी मिळाल्यावर न्यूझीलंडनं चांगली सुरुवात केली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही खेळाडूंनी 60 चेंडूत आपापली अर्धशतकं पूर्ण केली. ही भागीदारी हर्षित राणानं मोडली, ज्यानं हेन्री निकोल्सला बाद केलं. निकोल्सनं 69 चेंडूत 8 चौकारांसह 62 धावा केल्या. त्यानंतर हर्षितनं कॉनवेलाही बाद केलं. कॉनवेनं 67 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 56 धावांचं योगदान दिलं. यानंतर 28व्या षटकात सिराजनं विल यंगला बाद केलं. यंगनं 12 धावा केल्या. त्यानंतर 34व्या षटकात कुलदीप यादवनं ग्लेन फिलिप्सला बाद केलं. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 170 होती. त्यानंतर, 38व्या षटकात प्रसिद्धनं मिशेल हेला बाद केलं, ज्यानं फक्त 18 धावा केल्या. 43व्या षटकात ब्रेसवेलला अय्यरनं धावबाद केलं तेव्हा सहावी विकेट पडली. त्यानंतर पुढच्याच षटकात सिराजनं झकारीला बाद केलं. मात्र 48व्या षटकात न्यूझीलंडला मोठा धक्का बसला जेव्हा डॅरिल मिशेल 71 चेंडूत 84 धावा करुन बाद झाला. यानंतर क्रिस्टन क्लार्कनं शेवटच्या षटकांत 17 चेंडूत 24 धावांचं योगदान दिल्यानं कीवी संघाला 300 धावांची मजल मारता आली.
टीम इंडियानं जिंकला टॉस : तत्पुर्वी, टीम इंडियानं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार गिलनं दव घटक लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतींनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जैस्वाल खेळले नाहीत. दरम्यान, क्रिस्टन क्लार्कनं न्यूझीलंडकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर भारतीय वंशाचा क्रिकेटपटू आदित्य अशोकचाही कीवी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.
1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/pX6HYz772x #TeamIndia #INDvNZ #1stODI @IDFCfirstbank
— BCCI (@BCCI) January 11, 2026
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाचेरी फॉल्क्स, क्रिस्टन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
पुरुषांचा पहिलाच वनडे सामना : वडोदरा येथील नव्यानं नूतनीकरण केलेल्या कोटाम्बी स्टेडियमवर हा पुरुषांचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी इथं फक्त एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे आणि तो भारतीय महिला क्रिकेट संघानं खेळला होता. या सामन्यातील खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूनं होती. खेळपट्टीनं चांगला उसळी दिली आणि चेंडू अगदी सहजपणे बॅटवर येत होता. त्यामुळं, तुम्ही उच्च धावसंख्येच्या सामन्याची अपेक्षा करु शकता. मात्र, सुरुवातीला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना देखील मदत करु शकते.
भारतीय संघाचा वरचष्मा : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 120 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतानं 62 आणि न्यूझीलंडनं 50 सामने जिंकले आहेत. अशा प्रकारे, टीम इंडियाचा वरचष्मा आहे. दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मागील सात वनडे सामन्यांमध्ये फक्त भारतीय संघच जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
लाईव्ह सामना कधी आणि कुठं पाहायचा? : भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेतील पहिला सामना रविवार, 11 जानेवारी रोजी खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. याव्यतिरिक्त, तुम्ही ब्रॉडकास्टर पाहण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कला भेट देऊ शकता.
हेही वाचा :

