आज होणारा ENG vs IND सामना रद्द होणार? मँचेस्टरचं हवामान कसं असेल?
भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. भारतीय चाहते आता दुसऱ्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Published : July 4, 2026 at 2:47 PM IST
मँचेस्टर IND vs ENG 2nd T20I : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. भारतीय चाहते आता दुसऱ्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. चेस्टर-ली-स्ट्रीट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावून 189 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पाऊस आल्यानं सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता सर्वांचं लक्ष मँचेस्टरमधील दुसऱ्या टी-20 सामन्यावर लागलं आहे.
𝐌𝐚𝐭𝐜𝐡𝐝𝐚𝐲 𝐢𝐧 𝐌𝐚𝐧𝐜𝐡𝐞𝐬𝐭𝐞𝐫. ⚔️
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2026
We saw the promise. Now comes the explosion. 💥
Watch #ENGvIND 2nd T20I, TODAY 6 PM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels.#SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/WhuGqYPeUT
मँचेस्टरमध्ये हवामान कसं असेल? : ॲक्युवेदरच्या अहवालानुसार, शनिवारी मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसामुळं व्यत्यय येऊ शकतो. दिवसभरात पावसाची 57 टक्के शक्यता असून, आकाश ढगाळ राहील आणि जोरदार वारे वाहतील. यामुळं नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत सामन्यादरम्यान पावसाची 51% शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना थांबवावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी करावी लागू शकते. मात्र, मँचेस्टरचं मैदान पहिल्या सामन्यात वापरलेल्या मैदानापेक्षा चांगलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळं, पाऊस थांबल्यानंतर लगेचच मैदान पुन्हा खेळासाठी तयार होऊ शकते. त्यामुळं, सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे, जी चाहत्यांसाठी एक चांगली गोष्ट असू शकते.
ENG vs IND 2nd T20I: Pitch & Weather!
— Cricket Hub (@Anurag9793) July 3, 2026
• Match on July 4 at 7 PM IST at Old Trafford, Manchester.
• Pitch offers early seam & extra bounce; dew favors chasing.
• Overcast skies with a high threat of intermittent rain drizzles.
• Series tied 0-0 after the 1st T20I was… pic.twitter.com/XRU4Wudqkl
दोन्ही संघाचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं खेळला जाईल. हा सामना जिंकून दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता आणि फक्त पहिला डावच खेळता आला. त्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार अर्धशतकं झळकावून भारताला 7 गडी गमावून 189 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. शिवम दुबेनंही आपल्या वेगवान फलंदाजीनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मात्र, आयर्लंड मालिकेपासून संजू सॅमसननं एकही धाव काढलेली नाही.
हेही वाचा :

