ETV Bharat / sports

ICC महिला T20 विश्वचषक 2026 : चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

महिला टी-20 विश्वचषक 2026 चं आज वेळापत्रक जाहीर झालं आहे.

ICC Women T20 World Cup 2026
ICC महिला T20 विश्वचषक 2026 (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 24, 2026 at 2:37 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबई :आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) महिलांच्या टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये 12 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत होणार आहे. हा स्पर्धेचा 10 वा सीझन असून, यात 12 संघ सहभागी होणार आहेत. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार असून, भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषकानंतर टी-20 ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. स्पर्धेत दोन गटांत विभागणी झाली असून, प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 5 जुलैला लॉर्ड्सवर होईल.

गट आणि संघ :

गट 1 (ग्रुप A):ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स

गट 2 (ग्रुप B): वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड

बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स हे संघ गेल्या महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या पात्रता फेरीतून क्वालिफाय झाले आहेत. ही स्पर्धा 33 सामन्यांची असून, एका दिवशी तीन सामने खेळवले जातील. भारतीय वेळेनुसार पहिला सामना दुपारी 3 वाजता, दुसरा संध्याकाळी 7 वाजता आणि तिसरा रात्री 11 वाजता होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी-20 विश्वचषक 2026 वेळापत्रक (Women T20 World Cup 2026 Schedule)
भारतीय महिला संघ गट A मध्ये आहे. सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होणार आहेत.

तारीखसामनास्थान (Venue)वेळ (स्थानिक)भारतीय वेळेनुसार (अंदाजे)
14 जून 2026भारत विरुद्ध पाकिस्तानएजबेस्टन (Edgbaston)संध्याकाळी 7 वाजतारात्री 11:30 वाजता
17 जून 2026 भारत विरुद्ध नेदरलँड्सहेडिंग्ले (Headingley)संध्याकाळी 7 वाजतारात्री 11:30 वाजता
21 जून 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहॅम्पशायर बाउल (Bristol)संध्याकाळी 7 वाजतारात्री 11:30 वाजता
25 जून 2026 भारत विरुद्ध बांगलादेशओल्ड ट्राफर्ड (Old Trafford)संध्याकाळी 7 वाजतारात्री 11:30 वाजता
28 जून 2026भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालॉर्ड्स (Lord's)संध्याकाळी 7 वाजतारात्री 11:30 वाजता

भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध एजबेस्टनवर होणार असून, हा सामना चाहत्यांसाठी विशेष असेल. त्यानंतर नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्सवर सामना असं आव्हानात्मक वेळापत्रक आहे.

स्पर्धेची सुरुवात आणि महत्त्वाचे सामने: स्पर्धेचा पहिला सामना 12 जूनला यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात एजबेस्टनवर होईल. 13 जूनला स्कॉटलंड वि. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड असे सामने आहेत. 14 जूनला बांगलादेश वि. नेदरलँड्स आणि भारत वि. पाकिस्तान हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक असेल. सेमीफायनल 30 जून आणि 2 जुलैला द ओव्हलवर तर अंतिम सामना 5 जुलैला लॉर्ड्सवर होईल.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण वेळापत्रक : ही स्पर्धा इंग्लंडमध्ये 12 जून ते 5 जुलै 2526 दरम्यान खेळवली जाईल. एकूण 33 सामने, 7 मैदाने आणि 12 संघ सहभागी होती. वेळ BST (British Summer Time) नुसार आहे.

तारीखदिवससामनामैदान (Venue)वेळ (BST)टिप्पणी / गट
12 जून 2026शुक्रवारइंग्लंड विरुद्ध श्रीलंकाएजबेस्टन (Edgbaston)18:30उद्घाटन सामना, गट B
13 जून 2026शनिवारस्कॉटलंड विरुद्ध आयर्लंडओल्ड ट्राफर्ड (Old Trafford)10:30गट B
13 जून 2026 शनिवारऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकाओल्ड ट्राफर्ड14:30गट A
13 जून 2026 शनिवारवेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंडहॅम्पशायर बाउल (Rose Bowl)18:30गट B
14 जून 2026 रविवारबांगलादेश विरुद्ध नेदरलँड्सएजबेस्टन10:30गट A
14 जून 2026रविवारभारत विरुद्ध पाकिस्तानएजबेस्टन14:30गट A (महत्त्वाचा सामना)
16 जून 2026 मंगळवारन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंकाहॅम्पशायर बाउल14:30गट B
16 जून 2026 मंगळवारइंग्लंड विरुद्ध आयर्लंडहॅम्पशायर बाउल18:30गट B
17 जून 2026 बुधवारऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेशहेडिंग्ले (Headingley)10:30 BSTगट A
17 जून 2026बुधवारभारत विरुद्ध नेदरलँड्सहेडिंग्ले14:30 BSTगट A
17 जून 2026 बुधवारदक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानएजबेस्टन18:30 BSTगट A
18 जून 2026गुरुवारवेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंडहेडिंग्ले18:30 BSTगट B
19 जून 2026 शुक्रवारन्यूझीलंड विरुद्ध आयर्लंडहॅम्पशायर बाउल18:30 BSTगट B
20 जून 2026शनिवारऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्सहॅम्पशायर बाउल10:30 BSTगट A
20 जून 2026शनिवारपाकिस्तान विरुद्ध बांगलादेशहॅम्पशायर बाउल14:30 BSTगट A
20 जून 2026 शनिवारइंग्लंड विरुद्ध स्कॉटलंडहेडिंग्ले18:30 BSTगट B
21 जून 2026 रविवारवेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकाब्रिस्टल काउंटी ग्राऊंड10:30 BSTगट B
21 जून 2026रविवारदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतओल्ड ट्राफर्ड14:30 BSTगट A
23 जून 2026 मंगळवारन्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंडब्रिस्टल काउंटी ग्राऊंड10:30 BSTगट B
23 जून 2026 मंगळवारश्रीलंका विरुद्ध आयर्लंडब्रिस्टल काउंटी ग्राऊंड14:30 BSTगट B
23 जून 2026 मंगळवारऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानहेडिंग्ले18:30 BSTगट A
24 जून 2026बुधवारइंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजलॉर्ड्स (Lord's)18:30 BSTगट B
25 जून 2026गुरुवारभारत विरुद्ध बांगलादेशओल्ड ट्राफर्ड14:30 BSTगट A
25 जून 2026गुरुवारदक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्सब्रिस्टल काउंटी ग्राऊंड18:30 BSTगट A
26 जून 2026 शुक्रवारश्रीलंका विरुद्ध स्कॉटलंडओल्ड ट्राफर्ड18:30 BSTगट B
27 जून 2026 शनिवारपाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्सब्रिस्टल काउंटी ग्राऊंड10:30 BSTगट A
27 जून 2026 शनिवारवेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंडब्रिस्टल काउंटी ग्राऊंड14:30 BSTगट B
27 जून 2026 शनिवारइंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडद ओव्हल (The Oval)18:30 BSTगट B
28 जून 2026रविवारदक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेशलॉर्ड्स10:30 BSTगट A
28 जून 2026रविवारऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतलॉर्ड्स14:30 BSTगट A
30 जून 2023मंगळवारसेमीफायनल 1द ओव्हल14:30 BSTनॉकआऊट
2 जुलै 2026गुरुवारसेमीफायनल 2द ओव्हल18:30 BSTनॉकआऊट
5 जुलै 2026 रविवारअंतिम सामनालॉर्ड्स14:30 BSTफायनल

महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड : ही स्पर्धा महिला क्रिकेटसाठी महत्त्वाची ठरेल. 12 संघांची ही सर्वात मोठी स्पर्धा असून, भारतानं गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारखे मजबूत संघ असल्यानं स्पर्धा रंगतदार होईल.

हे वाचलंत का :

  1. 0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम
  2. अक्षर पटेलला प्लेइंग 11 मधून वगळल्यावरुन संघ व्यवस्थापनावर टीका; रविचंद्रन अश्विननं चांगलंच सुनावलं
  3. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर टीम इंडियात बदल होणार? प्रशिक्षकांनी दिली मोठी हिंट