SA vs NZ सेमीफायनल सामन्यात पाऊस खेळ खराब करणार? कसं आहे हवामान?
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Published : March 4, 2026 at 2:49 PM IST
कोलकाता SA vs NZ Semifinal : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ जवळजवळ समान आहेत, नाणेफेकीपासून ते हवामानापर्यंत सर्व काही बारकाईनं पाहिलं जात आहे. कोलकाता इथं आतापर्यंत अनेक महत्त्वाचे टी-20 विश्वचषक सामने खेळले गेले आहेत, ज्यात पावसाचा व्यत्यय आला नाही. अशातच सर्वांचं लक्ष आता उपांत्य सामन्याच्या हवामानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही, त्यांनी स्पर्धेत अपराजित राहून उपांत्य फेरी गाठली आहे.
So many exciting matchups in the first semi-final of the #T20WorldCup as South Africa take on New Zealand in Kolkata 🤔
— ICC (@ICC) March 4, 2026
Details on how to watch the tournament 📺https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/LvHtgcRrjh
सामन्यादरम्यान हवामान अनुकूल राहण्याची अपेक्षा : हवामान अहवालानुसार दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य सामन्यासाठी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पाऊस पडण्याची शक्यता नाही. दिवसा तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा असताना, संध्याकाळी ते सुमारे 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. आर्द्रतेचं प्रमाण सुमारे 69 टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळं संध्याकाळी दव पडणं महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळं, नाणेफेक जिंकणारा संघ हे लक्षात ठेवेल.
Two world-class teams aiming for a spot in a #T20WorldCup Final 🤝
— ICC (@ICC) March 4, 2026
Tournament broadcast details 📲 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/iCwf9xn1RT
दक्षिण आफ्रिकेनं गट टप्प्यात केला होता पराभव : टी-20 विश्वचषक 2026 मधील न्यूझीलंडचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे, ज्यामध्ये गट टप्प्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 गडी राखून एकतर्फी पराभवाचा समावेश आहे. त्यानंतर, कीवीज संघानं इंग्लंडविरुद्धचा सुपर-8 सामनाही गमावला, परंतु पाकिस्तानपेक्षा चांगल्या नेट रन रेटमुळं ते 3 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. या सामन्यात, कीवीज संघ त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्याचा आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा :

