उपराजधानीत होणार IND vs NZ पहिला T-20I सामना; कशी करायची ऑनलाईन तिकिटांची खरेदी?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याची तिकिट विक्री 17 जानेवारीपासून सुरु होईल. यासाठी व्हीसीएनं आधीच तयारी केली आहे.

Published : January 10, 2026 at 2:43 PM IST
नागपूर India vs new Zealand 1st T20I : विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) 21 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जामठा येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित करत आहे. जामठा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा पहिलाच द्विपक्षीय टी-20 सामना असेल. दरम्यान या सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.
कधी पोहोचणार दोन्ही संघ : नागपूरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडमधील शेवटचा टी-20 सामना 2016 मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. व्हीसीएनं माहिती दिली आहे की व्हीसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम सामना आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. प्रेक्षकांसाठी मोफत आणि प्रशस्त पार्किंग तसंच मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. न्यूझीलंड संघ 19 जानेवारी रोजी इंदूरहून चार्टर्ड विमानानं नागपुरात पोहोचेल, तर भारतीय टी-20 संघातील खेळाडूही 19 जानेवारीपर्यंत नागपुरात जमतील.
Up Next: 3 ODIs and 5 T20Is against India, starting in Vadodara on January 11 🇮🇳 #INDvNZ | 📸 = @PhotosportNZ pic.twitter.com/X7UuHYP6OZ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 23, 2025
व्हीसीए सदस्यांसाठी ऑफलाइन तिकीट विक्री : व्हीसीए लाइफ सदस्य आणि संलग्न क्लबसाठी तिकीट विक्री 13 ते 15 जानेवारी दरम्यान बिलिमोरिया हॉल, व्हीसीए, सिव्हिल लाइन्स इथं होईल. ही विक्री फक्त ऑफलाइन असेल.
सर्वसामान्यांसाठी ऑनलाइन तिकीट विक्री : सर्व चाहत्यांसाठी तिकीट विक्री 17 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो मोबाइल अॅप आणि वेबसाइटद्वारे ऑनलाइन सुरु होईल. एका मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचा वापर करुन प्रति व्यक्ती जास्तीत जास्त दोन तिकिटं बुक करता येतील. त्यानंतर 18 ते 20 जानेवारी दरम्यान बिलिमोरिया हॉल, सिव्हिल लाइन्स इथं ऑनलाइन तिकिटे प्राप्त करता येतील. जामथा स्टेडियममध्ये कोणतेही रिडेम्पशन काउंटर नसेल. या तिकिटांची किंमत कमीत कमी 650 तर जास्तीत जास्त 7000 हजारांपर्यंत असेल.
हेही वाचा :
- WPL 2026 मध्ये आज 'डबलहेडर'; दोन्ही सामने 'फ्री'मध्ये कसे पाहायचे?
- WPL 2026: चौथ्या हंगामाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या सामन्यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस-यो यो हनी सिंगनं वाढवला 'ग्लॅमर'
- 'आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा ठरणार विकासाचा मैलाचा दगड'; पुण्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

