ETV Bharat / sports

झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाला बंपर फायदा; आफ्रिकेचा कॅरोबियन संघावर आरामात विजय

2026 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सनं एकतर्फा पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं.

SA Beat WI by 9 Wickets
दक्षिण आफ्रिका (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 26, 2026 at 6:53 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहमदाबाद SA Beat WI by 9 Wickets : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सनं एकतर्फा पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं आठ विकेट्स गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 16.1 षटकांत केवळ एक विकेट गमावून सहज सामना जिंकला. कर्णधार एडेन मार्कराम हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला, त्यानं नाबाद 82 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळं टीम इंडियाला फायदा : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळं टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमावला, ज्यामुळं संघाचा रनरेट उणे 3 असा घसरला होता. दरम्यान, वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेला हरवल्यानंतर त्यांचा रनरेट 5 पर्यंत वाढवला. त्यामुळं, सेमीफायनलच्या मार्गावर राहण्यासाठी भारतासाठी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय आवश्यक होता.

शेफर्ड आणि होल्डरची खेळी व्यर्थ : या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजनं 83 धावांत 7 विकेट गमावल्या. त्यानंतर जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांच्या जोडीनं डाव सावरला. होल्डरनं 31 चेंडूत 49 धावा केल्या, तर शेफर्ड 37 चेंडूत 52 धावा करुन नाबाद राहिला. 9व्या क्रमांकावर फलंदाजी करणाता शेफर्ड टी-20 विश्वचषकात अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. जर संघाच्या इतर फलंदाजांनी अहमदाबादच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली असती तर जास्त धावसंख्या गाठता आली असती.

दक्षिण आफ्रिकेनं सहज जिंकला सामना : दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण आली नाही. संघानं फक्त एक विकेट गमावत आरामात विजय मिळवला. सलामीवीर अॅडम मार्कराम आणि क्विंटन डी कॉक यांनी धमाकेदार सुरुवात केली. संघानं आठ षटकांनंतर 96 धावांवर पहिली विकेट गमावली. डी कॉकनं 24 चेंडूत 47 धावा केल्या, तर मार्करामनं 46 चेंडूत 82 धावा केल्या. रियान रिकेल्टनसह तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि संघाच्या विजय मिळवून दिला.रिकेल्टननं या सामन्यात 28 चेंडूत 45 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. 24 वर्षांत पहिल्यांदाच असं घडणार; IND vs ZIM सामन्यात लिहिला जाणार नवा इतिहास
  2. WI vs SA सामन्यावर असेल टीम इंडियाचं लक्ष; सेमीफायनलसाठी समीकरण कसं असेल?
  3. IND vs ZIM सामना पावसामुळं रद्द होणार? चेन्नईमधून आली मोठी अपडेट