ETV Bharat / sports

पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चढावा लागेल डोंगर; कसा असेल सिनॅरीओ?

टी-20 विश्वचषकातील सुपर-8 च्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं न्यूझीलंडला चार विकेटनं हरवून त्यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग रोखत पाकिस्तानसाठी आशेचा किरण निर्माण केला.

PAK vs SL Match
पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चढावा लागेल डोंगर (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 28, 2026 at 9:26 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोलंबो PAK vs SL Match : 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकातील सुपर-8 च्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं न्यूझीलंडला चार विकेटनं हरवून त्यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग रोखत पाकिस्तानसाठी आशेचा किरण निर्माण केला. परंतु तरीही, पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणं सोपं होणार नाही. जरी पाकिस्ताननं श्रीलंकेला हरवलं तरी त्यांना न्यूझीलंडच्या नेट रन रेटला मागे टाकावं लागेल, जे त्यांच्यासाठी सोपं काम नसेल. पाकिस्तानला सेमीफायनल गाठायला काय समीकरण असणार आहे, ते जाणून घेऊया.

इंग्लंड संघ पहिल्या स्थानावर : इंग्लंड संघानं त्यांचे तीनही सुपर-8 सामने जिंकून सहा गुण मिळवले आहेत आणि आता हे निश्चित झालं आहे की इंग्लंड संघ ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर राहील. तर या पराभवासह न्यूझीलंडचे तीन सामन्यांपैकी एक जिंकल्यानंतर तीन गुण आहेत. तर पाकिस्तानचा दोन सामन्यांमधून एक गुण आहे. याचा अर्थ असा की जर पाकिस्ताननं श्रीलंकेला हरवले तर त्याचे तीन गुण होतील, परंतु फक्त सामना जिंकणं पाकिस्तानसाठी पुरेसं नाही.

पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल? : ताज्या गणितांवरुन असं दिसून येतं की जर पाकिस्तातननं पहिली फलंदाजी केली तर त्यांना कीवी संघाच्या रन रेटला मागे टाकण्यासाठी श्रीलंकेला किमान 64 धावांनी पराभूत करावं लागेल. जर पाकिस्ताननं दुसऱ्यांदा फलंदाजी केली आणि लक्ष्याचा पाठलाग केला तर पाकिस्तानला 13.1 षटकांत श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करावा लागेल. याचा अर्थ असा की जर श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी केल्यानंतर 180 धावा केल्या तर पाकिस्तानला 13.1 षटकांत त्या धावा कराव्या लागतील, जे सोपं काम नाही.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील नेट रन रेटमध्ये लक्षणीय फरक : पाकिस्तानचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा खूपच वाईट आहे. न्यूझीलंडचा नेट रन रेट सध्या अधिक 1.390 आहे, तर पाकिस्तानचा नेट रन रेट उणे 0.461 आहे. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यास पाकिस्तानचे न्यूझीलंडशी समान गुण होतील, परंतु त्यांचा नेट रन रेट वाढवण्यासाठी त्यांना मोठ्या विजयाची आवश्यकता असेल. एकंदरीत, शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सुपर-8 सामना रोमांचक होईल हे निश्चित आहे. न्यूझीलंड पुढं जाईल की त्यांचा प्रवास संपेल हे या सामन्यावर अवलंबून असेल.

हेही वाचा :

  1. T20 World Cup: न्यूझीलंडचा पराभव; पाकिस्तानचं आव्हान कायम
  2. विश्वविजेत्या टीम इंडियाचा कांगारुंविरुद्ध सलग दुसऱ्या वनडेत पराभव; मालिकाही गमावली
  3. झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियानं केला अद्भुत पराक्रम; वर्ल्ड कपच्या इतिहासात असं घडलंच नव्हतं