GCT Grand Finale: प्रज्ञानानंदची खराब सुरुवात; कारुआनानं जिंकला पहिला क्लासिकल गेम
ग्रँड चेस टूर (GCT) ग्रँड फिनालेच्या पहिल्या क्लासिकल गेममध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद अमेरिकन अव्वल खेळाडू फॅबियानो कारुआनाकडून पराभूत झाला.

Published : August 27, 2026 at 10:30 AM IST
मुंबई GCT Grand Finale : ग्रँड चेस टूर (GCT) ग्रँड फिनालेच्या पहिल्या क्लासिकल गेममध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद अमेरिकन अव्वल खेळाडू फॅबियानो कारुआनाकडून पराभूत झाला. 48 चालींच्या या सामन्यात प्रज्ञानंदला जिंकण्याची फारशी संधी नव्हती आणि कारुआनानं एका शानदार रणनीतीनं सामना जिंकला.
😱 ONE SECOND FROM DISASTER!
— Grand Chess Tour (@GrandChessTour) August 26, 2026
Talk about nerves of steel! In the second classical game against Fabiano Caruana, Praggnanandhaa made his move with just ONE SECOND left on the clock! ⏱️
The move was made just in time, giving him the 30-second increment and keeping the game alive.… pic.twitter.com/KHVlS5Ao7F
कारुआनानं एका गुंतागुंतीच्या इटालियन ओपनिंगनं सुरुवात केली आणि हळूहळू प्रज्ञानंदवर दबाव आणला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडू गोंधळलेला दिसत होता आणि कारुआनानं लहान लहान फायदे मिळवून परिस्थिती आपल्या बाजूनं वळवली. एंडगेममध्ये कारुआनाची स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत झाली. प्रज्ञानंदचा राजा असुरक्षित होता, ज्याचा अमेरिकन खेळाडूनं पुरेपूर फायदा घेतला. भारतीय ग्रँडमास्टरला पुनरागमन करणं कठीण गेलं आणि अखेरीस त्यानं पराभव स्वीकारला.
कारुआनानं घेतली मोठी आघाडी : ग्रँड फिनालेमध्ये क्लासिकल गेम जिंकल्याबद्दल सहा गुण दिले जातात. या परिस्थितीत, पहिला सामना जिंकून कारुआनानं प्रज्ञानंद यांच्यावर लक्षणीय आघाडी घेतली आहे. सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कारुआनापुढील आव्हान असेल की, पुढील क्लासिकल सामन्यात पुनरागमन करुन गुणांमधील अंतर कमी करणं.
🏆 Final: Caruana 9–3 Pragg
— Grand Chess Tour (@GrandChessTour) August 26, 2026
Fabiano Caruana won the first classical game, earning 6 points. The second classical game ended in a draw, giving both players 3 points and leaving Fabi with a 9–3 lead heading into rapid and blitz.
With a six-point advantage, Caruana is in a strong… pic.twitter.com/yQT7nWC1Kr
कसा पार पडणार सामना? : दोन क्लासिकल सामन्यांनंतर, दोन्ही खेळाडू दोन रॅपिड सामने खेळतील, ज्यातील प्रत्येक विजयासाठी चार गुण दिले जातील. यानंतर चार ब्लिट्झ सामने होतील, ज्यातील प्रत्येक विजयासाठी दोन गुण दिले जातील.
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनिर्णित : जर्मनीचा व्हिन्सेंट केमर आणि अमेरिकेचा वेस्ली सो यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी तीन गुण मिळाले. हा सामना ग्रँड फायनलचा भाग आहे, ज्याचं बक्षीस 450,000 अमेरिकन डॉलर्स आहे.
हेही वाचा :

