ETV Bharat / sports

27500 हून अधिक धावा करणाऱ्या दिग्गजाचा क्रिकेटला 'रामराम'; 20 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू डीन एल्गरनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

Dean Elgar
27500 हून अधिक धावा करणाऱ्या दिग्गजाचा क्रिकेटला 'रामराम' (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 27, 2026 at 9:48 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई Dean Elgar : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू डीन एल्गरनं जवळपास 12 वर्षे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानं 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचा शेवटचा सामना भारताविरुद्ध होता. आता, त्यानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं सांगितलं की तो यावर्षी एसेक्ससाठी आपला शेवटचा हंगाम खेळेल. एल्गरनं दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

डीन एल्गरची निवृत्तीची घोषणा : एल्गरनं 18 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद भूषवलं. जानेवारी 2024 मध्ये, नियमित कर्णधार टेंबा बावुमा संघाबाहेर गेल्यानं, त्यानं केप टाऊनमध्ये भारताविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एल्गरनं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्यानं काउंटी चॅम्पियनशिपसाठी एसेक्ससोबत करार केला. त्यानं या संघासाठी भरपूर धावा देखील केल्या. पण आता तो क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होणार आहे.

काय म्हणाला एल्गार : एल्गरनं व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. तो म्हणाला, "मला वाटतं की माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मी आता तरुण राहिलो नाही, माझं वय 39 वर्षे आहे. घरी माझ्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि माझं लहान मूल खूप वेगानं मोठा होत आहे. आता घरी राहून माझ्या जोडीदाराला आणि मुलांना वेळ देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंतचा माझा प्रवास खूप छान राहिला आहे. पण मी या हंगामाच्या अखेरीस निवृत्त होईन."

करिअरवर एक नजर : डीन एल्गरनं 2012 ते 2024 या काळात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. त्यानं 86 कसोटी सामने खेळून 37.92 च्या सरासरीनं 5347 धावा केल्या. या काळात एल्गरनं 14 शतकं आणि 23 अर्धशतकं झळकावली. याव्यतिरिक्त, त्यानं 8 वनडे सामन्यांमध्ये 17.33 च्या सरासरीनं 104 धावा केल्या. त्याची प्रथम-श्रेणी कामगिरी प्रभावी होती, त्यानं 279 सामन्यांमध्ये 41.90 च्या सरासरीनं 18981 धावा केल्या. या काळात त्यानं 55 शतकं आणि 77 अर्धशतकं झळकावली. 178 लिस्ट ए सामन्यांमध्ये एल्गरनं 43.50 च्या सरासरीनं 6264 धावा केल्या. त्यानं 10 शतकं आणि 45 अर्धशतकंही झळकावली. याशिवाय, 104 टी-20 सामन्यांमध्ये त्यानं 2594 धावा आणि 16 अर्धशतकं केली.

हेही वाचा :

  1. मुलगा ते मुलगी झालेली अनाया भारतात नव्हे तर 'या' देशात खेळणार क्रिकेट; स्वतः दिली माहिती
  2. IND vs SL 2nd Test Day 4: पावसामुळं चौथ्या दिवसाचा खेळ संपला; श्रीलंका संघ सामन्यात आघाडीवर
  3. जसप्रीत बुमराहचं वर्चस्व संपलं! 36 वर्षीय गोलंदाजाचा अव्वल स्थानी कब्जा