फुटबॉल जगतातील एका युगाचा अंत! लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
फुटबॉल जगतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


Published : August 31, 2026 at 10:47 PM IST
मुंबई Lionel Messi Retirement : फुटबॉल जगतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन दशकांहून अधिक काळ अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये मैदानावर धुमाकूळ घालणारा मेस्सी आता राष्ट्रीय संघाकडून खेळणार नाही. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं 2022 चा फिफा विश्वचषक जिंकला होता. तसंच 2026 मध्ये, मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघानं अंतिम सामना खेळला, परंतु स्पेनकडून पराभव झाल्यामुळं सलग दुसरं विजेतेपद हुकलं.
🏆 1x World Cup
— MASS (@Freak4Salman) August 31, 2026
🏆 2x Copa América
🏆 4x Champions League
🏆 8x Ballon d’Or
⚽ 800+ Career Goals
The stats tell the history, but the emotion you gave us will live forever. Thank you for completing football, Happy retirement Lionel Messi. 🐐👑 #Messi pic.twitter.com/QdZSNBDYP1
मेस्सीनं लिहिली भावनिक पोस्ट : मेस्सीनं आपल्या निवृत्ती संदर्भात इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, "काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, मी अंतिम सामन्यानंतर राष्ट्रीय संघातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक अत्यंत वेदनादायी निर्णय होता, परंतु मला आता जाणीव झाली आहे की हीच योग्य वेळ आहे. मी नेहमीच आपलं सर्वस्व दिलं आहे, केवळ अलिकडच्या वर्षांत जेव्हा आम्ही सर्व काही जिंकलं तेव्हाच नाही, तर त्याआधीही. मी नेहमीच या जर्सीसाठी कठोर परिश्रम घेतले आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि अर्जेंटिनियन असल्याचा अभिमान वाटावा यासाठी आपलं सर्वस्व दिलं."
🚨🇦🇷 Emotional statement by Lionel Messi after retirement from international football:
— lndian Sports Network (@IS_Netwrk29) August 31, 2026
Lionel Messi Said 🗣️: " i am saying goodbye to international football. i will never step onto the field wearing the argentina jersey again. this decision is extremely painful for me, and i have… pic.twitter.com/fvXKe4pD7B
2022 मध्ये झालं स्वप्न साकार : मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण 2022 मध्ये आला, जेव्हा त्याच्या कर्णधारपदाखाली अर्जेंटिनानं कतारमध्ये विश्वचषक जिंकला. 1986 नंतर अर्जेंटिनाचा हा पहिला विश्वचषक होता. मेस्सीनं त्या स्पर्धेत सात गोल केले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
The end of an era. 🐐🇦🇷
— Star Sports (@StarSportsIndia) August 31, 2026
Lionel Messi announces his retirement from international football, bringing an unforgettable chapter to an end.
World Champion. Copa América winner. Argentina legend. 🏆#Messi #Argentina #Legend #GOAT pic.twitter.com/gLFBxjo8lf
मेस्सीच्या नावावर इतरही अनेक विक्रम : तसंच, मेस्सीच्या कर्णधारपदाखाली अर्जेंटिनानं 2021 आणि 2024 मध्ये सलग दोनदा कोपा अमेरिका जिंकला. त्यानं संघाला 2026 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही नेलं, परंतु अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभूत झाल्यामुळं अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. हा मेस्सीचा सहावा विश्वचषक होता. तो पुरुष विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात सन्मानित खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत तीन विश्वचषक अंतिम सामने खेळले आहेत. 2014 मध्ये अर्जेंटिना जर्मनीकडून पराभूत झाला. या संघानं 2022 चा विश्वचषक जिंकला आणि 2026 मध्ये उपविजेता ठरला. आपल्या शेवटच्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीनं आठ गोल केले आणि चार गोलसाठी सहाय्य केले.
वडिलांच्या निधनानंतर कारकिर्दीबद्दल प्रश्न उपस्थित : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, वडील जॉर्ज मेस्सी यांच्या निधनानंतर मेस्सीनं आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याच्या वडिलांचं 8 ऑगस्ट रोजी वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होऊनही, मेस्सी क्लब स्तरावर खेळणं सुरु ठेवणार आहे. तो सध्या अमेरिकेतील मेजर लीग सॉकर क्लब इंटर मियामीचा भाग आहे. त्याचा सध्याचा करार 2028 च्या एमएलएस हंगामापर्यंत आहे.
हेही वाचा :

