FIFA विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीचं चित्र स्पष्ट; 48 पैकी 40 संघ बाहेर
फिफा विश्वचषक 2026 आता त्याच्या सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. 48 संघांपासून सुरु झालेला विजेतेपदाचा प्रवास आता केवळ आठ दावेदारांपुरता मर्यादित राहिला आहे.

Published : July 8, 2026 at 12:41 PM IST
FIFA World Cup Quarter Final : फिफा विश्वचषक 2026 आता त्याच्या सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. 48 संघांपासून सुरु झालेला विजेतेपदाचा प्रवास आता केवळ आठ दावेदारांपुरता मर्यादित राहिला आहे. 16 संघांच्या फेरीत अनेक मोठे उलथापालथ, शेवटच्या क्षणी झालेले गोल, पेनल्टी शूटआऊटमधील थरारक नाट्य आणि दिग्गज खेळाडूंची भंगलेली स्वप्ने यानंतर, उपांत्यपूर्व फेरीतील चार सामने आता निश्चित झाले आहेत. गतविजेता अर्जेंटिना आपले विजेतेपद टिकवून ठेवू शकेल का, की 72 वर्षांनंतर इतिहास रचणारा स्वित्झर्लंड पुन्हा एकदा उलथापालथ घडवून आणेल? की बलाढ्य स्पेन 2010 नंतर आपल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करु शकेल? हे केवळ येणारे दिवसच सांगतील.
Next: Quarter-finals#FIFAWorldCup pic.twitter.com/To50MPa0Ye
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 8, 2026
विश्वचषकाचे तिन्ही यजमान संघ स्पर्धेतून बाहेर : 16 संघांच्या फेरीत, म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीपूर्वी, आठ सामने खेळले गेले आणि त्यापैकी जवळजवळ सर्वच रोमांचक होते. सर्वात आश्चर्यकारक निकाल पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलविरुद्ध होता, ज्यांना नॉर्वेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या अर्जेंटिनानं इजिप्तविरुद्ध 0-2 नं पिछाडीवर असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं 3-2 नं विजय मिळवून स्पर्धेतून बाहेर पडणं थोडक्यात टाळले. विशेष म्हणजे, स्पर्धेचे तिन्ही यजमान संघ अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या फेरीतच बाहेर पडले. याशिवाय पॅराग्वे, ब्राझील, पोर्तुगाल, इजिप्त आणि कोलंबिया हे संघही आपापल्या स्पर्धेत हरले.
Round of 16 results 📋#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 7, 2026
8 संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल : आता उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वे आणि काही प्रमाणात स्वित्झर्लंड हेच असे संघ होते ज्यांच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता सर्वात कमी होती. तरीही, त्यांनी अंतिम आठ संघांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, मोरोक्को आणि स्पेन हे संघही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. हे आठ संघ आता अंतिम चार उपांत्य फेरीतील संघ निश्चित करण्यासाठी चार सामने खेळतील.
48 nations dared to dream, but only 8 remain. The Quarter-finals are locked in. 🏆#FIFAWorldCup #Qualified @mcdonalds pic.twitter.com/7C3WGlps0Q
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 7, 2026
फिफा विश्वचषक 2026 उपांत्यपूर्व फेरीचं वेळापत्रक : फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना 10 जुलै रोजी बोस्टन स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1:30 वाजता खेळला जाईल. स्पेन विरुद्ध बेल्जियम हा सामना 11 जुलै रोजी लॉस एंजेलिस स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता खेळला जाईल. नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना 12 जुलै रोजी मियामी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 वाजता खेळला जाईल आणि अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड हा सामना 12 जुलै रोजी कॅन्सस सिटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 6:30 वाजता खेळला जाईल.
उपांत्यपूर्व फेरीत खडतर लढत : स्पर्धा आता तिच्या सर्वात निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. एकीकडे, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न ठेवेल, तर दुसरीकडे, 72 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला स्वित्झर्लंड आपला इतिहास आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, बेल्जियम, नॉर्वे आणि मोरोक्को हे संघदेखील उपांत्य फेरीतील स्थानासाठी लढतील. उपांत्यपूर्व फेरीचे चार सामने जागतिक फुटबॉलमधील सर्वात बलाढ्य संघांमध्ये होतील. चाहत्यांना पुन्हा एकदा अत्यंत रोमांचक सामने पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
- Wimbledon 2026: जोकोविचनं जिंकला इतिहासातील सर्वात लांब उपांत्यपूर्व सामना; 5 तास 15 मिनिटाच्या खेळात फेलिक्स ऑगरचा पराभव
- रेफ्रींच्या कृपेनं मेस्सीचा अर्जेंटिना विजयी; पंचांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळं इजिप्तचा पराभव
- 72 वर्षांनी स्विस संघ FIFA च्या उपांत्य फेरीत; पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

