रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल, पोर्तुगालचा शेवटच्या क्षणी विजय; क्रोएशियन चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या
फिफा विश्वचषक 2026 च्या 32 संघांच्या फेरीतील पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील सामना टोरोंटो स्टेडियमवर अत्यंत रोमांचक रीतीनं संपला.

Published : July 3, 2026 at 10:03 AM IST
टोरोंटो Portugal vs Croatia : फिफा विश्वचषक 2026 च्या 32 संघांच्या फेरीतील पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील सामना टोरोंटो स्टेडियमवर अत्यंत रोमांचक रीतीनं संपला. पोर्तुगालनं हा सामना 2-1 नं जिंकून 16 संघांच्या फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो देखील खेळला आणि त्यानं एक महत्त्वपूर्ण पेनल्टीवर गोल केला. आता 7 जुलै रोजी पोर्तुगाल स्पेनविरुद्ध 16 संघांच्या फेरीत सामना खेळणार आहे.
A late winner sends Portugal into the Round of 16! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 3, 2026
पोर्तुगालचा शेवटच्या क्षणी विजय : क्रोएशियाविरुद्धचा 32 संघांच्या फेरीतील सामना पोर्तुगालसाठी सोपा नव्हता, कारण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर क्रोएशियाच्या पेरिसिचनं दुसऱ्या हाफच्या 53 व्या मिनिटाला गोल करुन आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पोर्तुगालनं जोरदार पुनरागमन केलं आणि 64 व्या मिनिटाला रोनाल्डोनं पेनल्टीवर गोल करुन सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 81 व्या मिनिटाला रोनाल्डोला बदली करण्यात आलं आणि त्याच्या जागी रुबेन नेवेस आला. 90 मिनिटांचा खेळ पूर्ण झाल्यावर, 18 मिनिटं चाललेल्या 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत खरी उत्कंठा पाहायला मिळाली. 90 व्या मिनिटाला, राफेल लिओनं दिलेल्या क्रॉसवर रामोसनं हेडरद्वारे गोल करुन पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
🇵🇹 Portugal have qualified for the Round of 16!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 3, 2026
क्रोएशियानंही केला गोल : पोर्तुगालनं 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर, क्रोएशियानं आक्रमक खेळ करत 90 व्या मिनिटाला गोल केला आणि जल्लोष साजरा केला. मात्र, खरा थरार तिथूनच सुरु झाला. पोर्तुगालनं ऑफसाईडसाठी अपील केलं, जे पंचांनी तपासलं. VAR नं ठरवलं की, जेव्हा क्रोएशियन खेळाडूनं पास दिला, तेव्हा त्यांचा दुसरा खेळाडू ऑफसाईड होता आणि तो गोल रद्द करण्यात आला. त्यानंतर तीन मिनिटं खेळ पुन्हा सुरु झाला आणि पंचांनी शिट्टी वाजवताच पोर्तुगाल 2-1 नं जिंकला.
Cristiano Ronaldo ✨#FIFAWorldCup pic.twitter.com/cDkBhF1jzy
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 3, 2026
चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या : या निर्णयामुळं संतप्त झालेल्या क्रोएशियन चाहत्यांनी निषेध म्हणून बीएमओ फील्डवर पाण्याच्या बाटल्या फेकायला सुरुवात केली, ज्यामुळं खेळ थोड्या वेळासाठी थांबवण्यात आला. गोल करणारा पेरिसिच चाहत्यांना शांत करण्यासाठी पुढं आला, त्यानंतर स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर ऑफसाइडच्या निर्णयाचा रिप्ले दाखवण्यात आला. बीबीसीच्या समालोचकांच्या मते, रिप्ले दाखवण्याचा उद्देश चाहत्यांचा राग शांत करणं हा होता, जेणेकरुन त्यांना दिसेल की पासालिच तांत्रिकदृष्ट्या ऑफसाइड होता.
हेही वाचा :

