ब्राझीलचा पराभव होताच दिग्गज खेळाडू नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; 80 गोलांसह कारकिर्दीचा शेवट
फिफा विश्वचषक 2026 मध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याचं ब्राझीलचं स्वप्न भंगलं आहे. या पराभवानंतर लगेचच, ब्राझीलचा दिग्गज खेळाडू नेमारनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.

Published : July 6, 2026 at 9:33 AM IST
Neymar Retires : फिफा विश्वचषक 2026 मध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याचं ब्राझीलचं स्वप्न भंगलं आहे. नॉर्वेनं एका रोमांचक सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला 2-1 नं पराभूत करुन स्पर्धेतून बाहेर काढलं. या पराभवानंतर लगेचच, ब्राझीलचा दिग्गज खेळाडू नेमारनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळं या ब्राझिलियन फुटबॉलपटूच्या एका गौरवशाली युगाचा अंत झाला. सामन्यानंतर नेमारला रडू कोसळलं आणि तो म्हणाला, "मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला, मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला. आता सर्व काही संपलं आहे. माझा प्रवास जिथं सुरु झाला होता, तिथंच संपला."
🚨🇧🇷 BREAKING: Neymar Jr. has officially retired from international football. 🥹💔 pic.twitter.com/Go0BP9bvNN
— World Cup 2026 (@ofootball__) July 5, 2026
हालंडनं हेडरद्वारे केला सामन्यातील पहिला गोल : हा सामना न्यू जर्सीमधील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला गेला. सुरुवातीपासूनच ब्राझीलनं नॉर्वेवर दबाव कायम ठेवला, परंतु नॉर्वेच्या बचावानं भिंतीप्रमाणे भक्कम बचाव करत ब्राझीलला गोल करण्यापासून रोखलं. 79व्या मिनिटाला, अँडर्स स्केजल्डर्पच्या अप्रतिम पासवर अर्लिंग हालंडनं हेडरद्वारे गोल करुन नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. काही मिनिटांनंतरच, हालंडनं आपला दुसरा गोल करुन स्कोअर 2-0 असा केला. तिथून पुढं ब्राझीलसाठी पुनरागमन करणे अधिकाधिक कठीण होत गेलं.
🚨🚨 BREAKING: Neymar announces his RETIREMENT FROM INTERNATIONAL FOOTBALL. 👋🏼🇧🇷
— Fabrizio Romano (@FabrizioRomano) July 5, 2026
“I tried. I tried. It started here at Met Life stadium and I finished here. It is now over”, Ney said after the game.
His story with the Brazilian national team is over. pic.twitter.com/vPIFflyJHq
ब्राझीलनं पेनल्टीवर केला आपला पहिला गोल : सामन्याच्या शेवटच्या मिनिटात, म्हणजेच अतिरिक्त वेळेत, नॉर्वेच्या लिओ ओस्टिगार्डनं कॅसेमिरोवर फाऊल केल्यामुळं ब्राझीलला पेनल्टी मिळाली. अतिरिक्त वेळेच्या 10व्या मिनिटाला नेमारनं ही पेनल्टी गोलमध्ये रुपांतरित केली. या गोलमुळं ब्राझीलला विजय मिळाला नसला तरी, त्यांच्या पराभवाचं अंतर (2-1) थोडं कमी झालं. अशाप्रकारे, सामना जिंकून नॉर्वेनं आपल्या 88 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं.
Erling Haaland's brace sends Norway to the quarter-finals! 👊#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 5, 2026
नेमारनं 80 गोलांसह केला आपल्या कारकिर्दीचा शेवट : हा गोल नेमारचा या विश्वचषकातील पहिला आणि त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 80 वा गोल होता. त्यानं ब्राझीलसाठी एकूण 130 सामने खेळले, ज्यात 80 गोल केले आणि 59 वेळा गोलसाठी सहाय्य केले. तो ब्राझीलचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला. आपल्या कारकिर्दीत, नेमारनं ब्राझीलच्या 2013 च्या फिफा कॉन्फेडरेशन्स कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच, त्यानं 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मायदेशात संघाला ऐतिहासिक पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
हेही वाचा :

