सोप्या सामन्यात कोलंबियाचा घानावर विजय; 'राऊंड ऑफ 16' मध्ये स्वित्झर्लंडशी होणार सामना
कॅन्सस सिटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलंबियानं घानाला 1-0 नं सहज हरवून फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम 16 मध्ये प्रवेश केला.

Published : July 4, 2026 at 11:56 AM IST
Colombia vs Ghana : कॅन्सस सिटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलंबियानं घानाला 1-0 नं सहज हरवून फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. यासह, कोलंबियाने या विश्वचषकातील आपली अपराजित मालिका कायम ठेवली. पुढील फेरीत कोलंबियाचा सामना स्वित्झर्लंडशी होईल.
🇨🇴 Colombia have qualified for the Round of 16!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
घानाची निराशाजनक कामगिरी : या सामन्यातील घानाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. संघाला लक्ष्यावर एकही शॉट मारता आला नाही. दुसरीकडे, कोलंबियानं संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांनी 14व्या मिनिटाला गोल करुन घानावर दबाव आणला. योहान आरियासनं हा गोल केला. 10व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या लुईस सुआरेझनं उभ्या असलेल्या आरियासला पास दिला, ज्यानं वेळ न घालवता गोल केला. अँटोनियो सिमिओन्योनं घानासाठी प्रयत्न केला, पण त्याचा जवळून मारलेला शॉट क्रॉसबारवरुन गेला. कोलंबियानं पहिल्या हाफमध्ये अनेक संधी निर्माण केल्या पण त्यांना गोल करण्यात अपयश आलं.
Colombia claim the last spot in the Round of 16 👊#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
दुसऱ्या हाफमधील प्रयत्न अयशस्वी : दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. कोलंबियानं सर्वाधिक संधी निर्माण केल्या. 69व्या मिनिटाला असं वाटलं की कोलंबियानं आपला दुसरा गोल केला आहे. मात्र, तसं झालं नाही. पार्टेचा शॉट गोलपोस्टच्या बाहेर गेला. यानंतरही, कोलंबियाच्या आक्रमणानं घानाची परीक्षा घेणं सुरुच ठेवलं. या सामन्यातील घानाची एकमेव चांगली गोष्ट ही होती की त्यांनी दुसरा गोल होऊ दिला नाही. मात्र, यामुळं त्यांचा पराभव टळला नाही.
आजपासून राऊंड ऑफ 16 चा थरार : 32 संघांची फेरी पूर्ण झाल्यानंतर, रविवारी 16 संघांची फेरी सुरु होईल. पहिल्या सामन्यात, कॅनडाचा सामना ह्यूस्टनमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता मोरोक्कोशी होईल. यानंतर, पॅराग्वेचा सामना फिलाडेल्फियामध्ये भारतीय वेळेनुसार पहाटे 2:30 वाजता फ्रान्सशी होईल.
हेही वाचा :
- FIFA च्या इतिहासात इजिप्तनं पहिल्यांदाच जिंकला नॉकआउट सामना; 'राऊंड ऑफ 16' मध्ये मेस्सीचं आव्हान
- ह्रदयाचे ठोके वाढवणाऱ्या सामन्यात अखेर अर्जेंटिना विजयी; 2 गोल करुनही केप व्हर्डेचा निसटता पराभव
- इंग्लंड-भारत दुसऱ्या टी-20 सामन्याआधी वैभवची 'New Chapter' कॅप्शनसह स्टोरी; आंतरराष्ट्रीय पदार्पण की आणखी काही?
Conclusion:

